सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 AM2021-05-22T04:12:13+5:302021-05-22T04:12:13+5:30

पथ्रोट : गावातील जयसिंग शाळेच्या आवारातील गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून १० ते १५ हजार रुपये चोरट्याने लंपास केले. ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

googlenewsNext

पथ्रोट : गावातील जयसिंग शाळेच्या आवारातील गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून १० ते १५ हजार रुपये चोरट्याने लंपास केले. १७ मे रोजी रात्री ही घटना घडली. दीपक कमलदास माहोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत शुभम सतीश मालवी (२६) या युवकाविरुद्ध संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी भादंविच्या कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.

---------------

फोटो पी २० शिंदी

शिंदी बु. येथे होणार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण

शिंदी बु : अचलपूर पंचायत समितीचे माजी सभापती देवेंद्र पेटकर यांच्या पाठपुराव्यामुळे गावात लसीकरण सुरू होणार आहे. पेटकर यांनी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांच्यासह प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी तिलक अरके यांना पत्रव्यवहार करीत त्वरित कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व्हावे, याकरिता पाठपुरावा केला. काकडा, शिंदी, कुष्ठा या गावात लसीकरण होणार आहे.

--------------

६४ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी

अमरावती : स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे यांच्या उपस्थितीत १८ मे रोजी राजापेठ बसस्थानकाजवळ मोबाईल व्हॅन आरोग्य विभागाच्या टीमद्वारे ६४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यात आली. स्वास्थ्य निरीक्षक धनिराम कलोसे, मनीष हडाले, महेश पळसकर, प्रीती दाभाडे, योगेश कंडारे, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

--------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.