सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:03+5:302021-05-23T04:12:03+5:30
पोहरा बंदी : कोरोनाने दररोज दाढी करणाऱ्यांची आणि त्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची पंचाईत केली. लॉकडाऊनने केस कर्तनालय बंद ...
पोहरा बंदी : कोरोनाने दररोज दाढी करणाऱ्यांची आणि त्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची पंचाईत केली. लॉकडाऊनने केस कर्तनालय बंद आहेत. घरी बोलावल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे कोरोना नसल्याची खात्री करून एकमेकांची दाढी व केस कापण्याची युक्ती गावोगावी केली जात आहे.
---------------
अंजनसिंगी येथे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा
अंजनसिंगी : येथील श्री कान्होजी बाबा कनिष्ठ महाविद्यालयात १७ ते ३१ मे दरम्यान ऑनलाईन व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यात आली. संस्थाध्यक्ष सुधीर शेंडे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य भाऊराव गाढवे, जयंत कारमोरे, प्रतिभा काळमेघ, संजय शेणमारे, निखिल वाघ, स्वाती दामोदरे, ममता दयने, दिलीप खुपसे, प्रवीण देशमुख, निखिल वाघ, दीपक अंबरते यांनी करून दिला.
---------------
शेतात केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
अंजनगाव सुर्जी : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार गुरुवारी शेतकरी संघटनेचे माणिकराव मोरे यांच्या शेतात केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी अच्युतराव गोबरे, वासुदेवराव करुले यांनी मार्गदर्शन केले. ओमप्रकाश मुरतकर, विजय मोरे, वासुदेव करुले, गजानन तायडे, धनंजय मोरे, नीलेश मोरे, मनोज मोरे, दत्ता मोरे, उमेश धुमाळे, राहुल मोरे, साहेबराव मेहरे, राजेश इंगळे, महेंद्र सावरकर, अशोक सोनटक्के, रामकृष्ण डांगे, अमोल वाकोडे, मधुकर मोरे, रामदास सावरकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
---------------