सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:17+5:302021-05-28T04:10:17+5:30

परतवाडा : शहरातील ब्राह्मण सभा कॉलनी येथून गजानन मुळशीराम सावरकर (४६, रा.कैकाडीपुरा) यांची एमएच ३० क्यू ५२४६ या क्रमांकाची ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

परतवाडा : शहरातील ब्राह्मण सभा कॉलनी येथून गजानन मुळशीराम सावरकर (४६, रा.कैकाडीपुरा) यांची एमएच ३० क्यू ५२४६ या क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने ८ मे रोजी लंपास केली. ते येथे मजुरीसाठी आले होते. परतवाडा पोलिसांनी २५ मे रोजी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------

ट्रॅक्टरमध्ये रेती भरून चालकाचे पलायन

चांदूर बाजार : पोलिसांचे पथक कारवाईसाठी येत असल्याचे पाहताच वाठोडा येथील नदीपात्रात रेती भरत असलेला दर्शन खाडे (रा. शिराळा) हा ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन पसार झाला. चांदूरबाजार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------

युवकाची महिलेला जीवे मारण्याची धमकी

वरूड : तालुक्यातील टेंभूरखेडा येथे शेतीवर एक लाखाचे कर्ज काढून द्या, असा आजोबा मारोतराव सोनुले यांच्याकडे तगादा लावणाऱ्या राहुल दिलीप सोनुले (२५) याने त्याच्या ३४ वर्षीय काकुला काठीने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. २५ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली.

----------------

चालकांनी केले डिझेल लंपास

धामणगाव रेल्वे : काशी खेड शिवारात सुरू असलेल्या कामात पोकलेनमध्ये ११० लिटर डिझेल कमी आढळून आल्याची तक्रार राहुल पुंडलिक सरदार (२९, अमरावती) यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात २५ मे रोजी दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोकलेनमध्ये २४ मे रोजी २३० लिटर डिझेल भरले होते. त्यानंतर चार तास काम चालले. मात्र, डिझेल अत्यंत कमी आढळले. त्यांच्या तक्रारीवरून चालक कमलेश सुखदेव येवले (२५) व आनंद फतिया येवले (३१, दोन्ही रा. भैसही), रितेश प्रकाश पाटणकर (२७, रा. शिरपूर तालुका आर्वी), बंटी रामेश्वर कोडापे (२३), नितीन प्रभाकर बोरीवार (२२, दोन्ही रा. बैढवणा, ता. आर्वी) शारीक अहमद अब्दुल जब्बार (२८, रा. शिरपूर बोके, ता. आर्वी) विरुद्ध दत्तापूर पोलिसांनी भादंविचे कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------

धामणगाव रेल्वे येथे घरफोडी

धामणगाव रेल्वे : शहरातील नेहरूनगर परिसरातील रहिवासी दिनेश मुंदडा (७९) यांचे बंद घर फोडून अज्ञाताने १५ हजार रुपये लंपास केले. ते अमरावती येथे २४ मे रोजी मुक्कामाला असताना ही घटना घडली. दत्तापूर पोलिसांनी याप्रकरणी भादंविचे कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------

आमदुरी येथून शेडमधील कोंबड्या लंपास

कुऱ्हा : नजीकच्या आमदुरी येथे विलास रामदास ढगे (६०, जळका जगताप, ता. चांदूर रेल्वे ) यांनी शेतातील गुरांच्या गोठ्यानजीक बांधलेल्या शेडमधील ३० कोंबड्या अज्ञाताने लंपास केल्या. २१ मे रोजी ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. यात १५ हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. कुऱ्हा पोलिसांनी २५ मे रोजी गुन्हा नोंदविला.

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.