सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:24+5:302021-05-28T04:10:24+5:30

अंजनगाव सुर्जी : दुकानातून साहित्य आणणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा ४० वर्षीय इसमाने विनयभंग केला. मुलीने ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

googlenewsNext

अंजनगाव सुर्जी : दुकानातून साहित्य आणणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा ४० वर्षीय इसमाने विनयभंग केला. मुलीने आरडा-ओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतल्याचे पाहून तो पळून गेला. याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून सुरेश पुंडलिक रंधे ऊर्फ अंगारा (४०, रा. भालदारपुरा) विरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलिसांनी भादंविचे कलम ३५४, ३५४ ड, व पोक्सो अन्वये गुन्हा नोंदविला. २५ मे रोजी दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.

----------------

रामपूर शिवणी येथे महिलेला मारहाण

नांदगाव खंडेश्वर : जागेचे मोजमाप करून दीर व लहान भावासोबत तेथे खुंटीचे निशाण करणाऱ्या ४९ वर्षीय महिलेला केस ओढून खाली पाडले. मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी बाबू एकनाथ तऱ्हेकर (५०) व अन्य दोघांविरूद्ध नांदगाव खंडेश्वर विरुद्ध गुन्हा नोंदविला. २५ मे रोजी ही घटना घडली.

----------------

दुचाकी लावण्यावरून भावंडात मारहाण

शिरजगाव कसबा : करजगाव येथे घरापुढे दुचाकी लावण्यावरून भावंडात मारहाण झाली. विनोद श्रावणजी मालखेडे याने शिवीगाळ केली, तर त्याच्या पत्नीने घरातून लोखंडी पाईप आणून हातावर मारला, अशी तक्रार बाळू श्रावण मालखेडे (६०) यांनी शिरजगाव कसबा पोलिसांत २५ मे रोजी नोंदविली.

----------------

वहिनीला दिराकडून मारहाण

मंगरूळ चव्हाळा : जमिनीच्या मुद्द्यावरून लगतच्या बुधवाडा येथे गौतम घनशाम हुमणे (४०) याने घराच्या अंगणात बसून असलेला भाऊ दिलीप घनश्याम घुमने (४४) यांना शिवीगाळ केली. दिलीपची पत्नी सुनीता यांनी त्याला हटकले असता बांबूच्या काठीने सुनीताच्या डोक्यावर मारून गौतमने जखमी केले. २४ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

----------------

हॉटेलच्या बांधकामावर लोखंड चोरीचा प्रयत्न

नांदगाव खंडेश्वर : अमरावती ते नांदगाव खंडेश्वर मार्गावर हॉटेलच्या बांधकामावरून लोखंड चोरीचा प्रयत्न उमेश किसनराव चौधरी (२८, रा. गोवारीपुरा, नांदगाव खंडेश्वर) याने २४ मे च्या रात्री केला. राहुल सोमेश्वर गुल्हाने (३२, रा. वार्ड क्रमांक १) यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेला. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

----------------

म्हैसपूर येथे चोराला पकडले

येवदा : नजीकच्या म्हैसपूर येथे चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेला किशोर श्रीराम शेलोकार (रा. पिंपळोद) याला कमल किशोर नामदेव डांगरे (३३) व त्यांच्या शेजाऱ्याने पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. २३ मे रोजी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी किशोरविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ५११ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------

सख्याहरींनी काढली मुलीची छेड

येवदा : घरापुढे बसलेल्या मुलीला अविनाश रणजीत वानखडे (२०, रा. इंदिरानगर) त्याने हातवारे करून तिची छेड काढली. तिने ही बाब आईला सांगताच अविनाश त्यांच्याकडे आला. माझ्यासोबत लग्न न केल्यास स्वतःला संपवेन, असे म्हणून तो तेथून निघून गेला. याप्रकरणी पोलिसांनी अविनाशविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

शिवारात वृद्धेला मारहाण

चिखलदरा : तालुक्यातील वस्तापूर शिवारात चुलत भावाच्या शेतात बकरीचा चारा कापणारे बिसराम लखाजी बेलसरे (६०) यांना प्यारेलाल लालजी बेलसरे (२५) याने जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी भादंविचे कलम ३२५, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. २३ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली.

--------------------------------

दुचाकीच्या धडकेत युवक जखमी

धारणी : सावलीखेडा ते डाबका मार्गातील पुलाजवळ रवींद्र दत्ता कांबळे (३२, रा. कोंबडा ढाणा) व त्याचा मित्र सूरज लालराम धुर्वे (३२, रा. गोलाई) हे एमएच २० एफ बी २४४६ क्रमांकाच्या दुचाकीने धारणीवरून सावलीखेडा येथे येत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते जखमी झाले. २४ मे रोजी ही घटना घडली. धारणी पोलिसांनी भादंवि कलम ३३७, २७९ अन्वये गुन्हा नोंदविला. धडक देणाऱ्या दुचाकीवर तिघेजण स्वार होते असे तक्रारीत नमूद आहे.

----------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.