सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:11 AM2021-06-02T04:11:36+5:302021-06-02T04:11:36+5:30
फोटो पी ०१आयसोलेनशन आयसोलेशनमध्ये दिव्यांग, ज्येष्ठांसाठी लस राखीव अमरावती : आयसोलेशन दवाखाना येथील केंद्रावर दिव्यांग आणि ७० वर्षांवरील व्यक्तींसाठी ...
फोटो पी ०१आयसोलेनशन
आयसोलेशनमध्ये दिव्यांग, ज्येष्ठांसाठी लस राखीव
अमरावती : आयसोलेशन दवाखाना येथील केंद्रावर दिव्यांग आणि ७० वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध लसींच्या प्रमाणात दररोज डोस राखीव ठेवण्यात येत आहे. या गटात येणाऱ्या अनेक नागरिकांना याचा लाभ मिळत आहे. या केंद्राच्या प्रमुख डॉ. शारदा टेकाडे, डॉ. देवेंद्र गुल्हाने हे लसीकरणासाठी सहकार्य करीत आहेत.
-------------
वेलकम पॉईंटवर २०२ जणांची तपासणी
अमरावती : वेलकम पाँईट चौक येथे सोमवारी एकूण २०२ नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेण्यात आली. त्यातील सर्व २०२ व्यक्ती निगेटिव्ह आल्या. या ठिकाणी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी भेट दिली व स्वत:चीदेखील रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेतली. यावेळी स्वास्थ्य निरीक्षक रोहित हडाले, श्रीकांत डवरे, अनिल गोहर, अरुण पाटील, सचिन हानेगावकर, सागर राजुरकर, अनिकेत मिश्रा, अमर खट्टर, दीपक सरसे, चव्हाण, खडसान, राजेश उसरे उपस्थित होते.
---------
फोटो पी ०१ शिंदी
शिंदीत नागरिकांची कोरोना चाचणी
शिंदी बु. : अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. सरपंच रजनी गजभिये, उपसरपंच शहजाद, सचिव बाळासाहेब ठोकणे, डॉ. गणेश मालखेडे, आरोग्य सेवक ठाकूर, रायबोले, निमजे, बदकुले, आरोग्य सेविका चित्रा जवारकर, पडोळे, आरती पागृत तसेच आशा वर्कर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
-----------
गोपालनगर येथे नागरिकांची कोरोना चाचणी
अमरावती : बडनेरा मार्गावर गोपालनगर येथे मोबाईल व्हॅनद्वारे एकूण १०२ नागरिकांची आरटी-पीसीआर चाचणी करून घेण्यात आली. सदर मोहिमेत सहायक आयुक्त विशाखा मोटघरे व भाग्यश्री बोरेकर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू ढिक्याव, स्वास्थ्य निरीक्षक विनोद टांक, मिथून उसरे, सोपान माहुलकर, इम्रान खान, अक्षय दातेराव तसेच परिहार, राजेश चावरे, अजय चावरे, निकम, यादव, बीट प्यून नरेंद्र डुलगज, संदीप ढिक्याव व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
--------------
घुईखेड ग्रामस्थांना अन्न व किराणा किट
चांदूर रेल्वे : स्व. कमलाबाई ब. टावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (नागपूर) संचालित स्व. कमलाबाई ब. टावरी इंग्लिश स्कूल (घुईखेड) यांच्यामार्फत गावातील तसेच टिटवा येथील निराधार, बेघर, आश्रित, अपंग, विधवा अशा अनेक नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.
-----------------
खरिपातील पीक विमा केव्हा?
भातकुली : खरिपातील सर्व पिकांची नुकसानभरपाई देण्याची वेळ निघून गेली आहे. तरीसुद्धा पीक विमा मिळालेला नाही. यासंदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल भारसाकळे यांनी जिल्हाधिकारी व विभागीय कृषी सहसंचालकांकडे केली आहे.
------------------
गावस्तरीय कोरोना समिती फक्त कागदावरच
शेंदोळा खुर्द : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावोगावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्या उपायांची अंमलबजावणी करण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर कोरोना नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. परंतु, ही समिती कागदावरच आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. कारण दिवसेंदिवस गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने मात्र उपाययोजना होताना दिसत नाही. गावामध्ये धूर फवारणी असो, हायपोक्लोराईडची फवारणी असो, कोरोना रुग्णांनी काय खबरदारी घ्यायची याबाबत मार्गदर्शन असो, अशी कुठलीही कामे होताना दिसत नाही. पावसाचे दिवस पुढे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय आणि या समितीने समन्वयातून तातडीने उपाय करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
----------------
विजेच्या लपंडावामुळे शेंदोळा खुर्दवासी त्रस्त
शेंदोळा खुर्द : पंधरवड्यापासून गावातील नागरिकांसोबत वीज लपंडाव खेळत आहे. दररोज तीन ते चार तास वीज गूल राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उपकेंद्राला कॉल केला असता, आम्ही काहीही करू शकत नाही, तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करा, अशी उत्तरे नागरिकांना दिली जात आहेत. गावातील वायरमनचा मोबाईल हा बरेचदा ‘नॉट रिचेबल’ असतो. त्यामुळे नागरिकांनी दाद कोणाकडे मागावी, हा यक्षप्रश्न गावकऱ्यांपुढे आहे.
----------------
फोटो पी ०१ पवार
सिंधुनगरमध्ये ओपन जीम
अमरावती : बसपा गटनेता तथा नगरसेवक चेतन पवार यांच्या निधीमधून शदानी सेवा मंडळद्वारे संचालित साई राजाराम चॅरिटेबल ट्रस्ट (सिंधूनगर) येथील बगीचात ओपन जीमचे लोकार्पण व सिंधूनगर येथील डेमला यांच्या घरापासून ते राजेश कपूर यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन साई युधिष्ठीरलाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेतन पवार, संतोष महाराज, स्वामी शर्मा, माजी नगरसेवक अमोल ठाकरे, तोताराम खत्री उपस्थित होते.
---------