सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:17+5:302021-06-04T04:11:17+5:30
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्रामध्ये ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांचा ...
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्रामध्ये ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांचा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी जिचकार यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण केले. यावेळी डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति केंद्राचे संचालक डॉ. गजानन गुल्हाने, डॉ. पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश जगताप, श्री संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचे प्रभारी प्रमुख डॉ. दिलीप काळ, महानुभाव पंथाचे अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. राजेंद्र सोनपेटकर तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
------------
‘बाकी रंग गुलजार के संग' संगीत मैफल रविवारी
अमरावती: गुलजार यांच्या निवडक गीतांची ऑनलाईन मैफल ६ जून रोजी रात्री ८.३० वाजता सिंफनी ट्यून्स या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह पाहता येईल. या कार्यक्रमाचा सर्व रसिकांना नि:शुल्क आनंद घेता येईल.
या मैफलीत संजय व्यवहारे, डॉ. नयना दापूरकर, गुरुमूर्ती चावली, पल्लवी राऊत, अरविंद व्यास, सिरिषा चावली गायन करतील. संगीत संयोजन सुनित बोरकर यांचं आहे. पियानोची साथ सचिन गुडे यांची आहे. तबल्याची साथ विशाल पांडे करणार आहेत.
------------
पोषण आहार किटमधून तेल गायब
तळवेल : संपूर्ण राज्यामध्ये गर्भवती महिला व ६ वर्ष आतील बालकांना प्रत्येक महिन्याला एका किटचे वाटप करण्यात येते. या किटमध्ये कडधान्य, डाळ, गहू, मसाले सारख्या वस्तूंचा यामध्ये समावेश असतो. परंतु काही महिन्यांपासून या किटमधील तेल कमी करून त्याऐवजी साखर या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. तेलाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
------------
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा
अमरावती : अमरावती शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे,शिक्षक आघाडीचे पदाधिकारी व नागपूर विभाग कृती समितीचे अध्यक्ष सुरेश कामनापुरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची १ जून रोजी मुंबई येथे भेट घेतली. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नावर व विनाअनुदानित शाळेमधील सेवा संरक्षण घोषित अघोषित, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमधील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणेबाबत चर्चा झाली.
------------
फोटो पी ०३ चेक
कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री सहायता निधी
मोर्शी : तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कोरोना आपत्ती निवारणार्थ एक हात मदतीचा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला ३० हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी रमेश काळे, प्रकाश टेकाळे, डॉ. धनंजय तट्टे, संजय कळस्कर, गजानन तायवाडे, अभिजित मानकर, सुनंदा तांदळे, मनोज टेकाळे, डॉ गजानन चरपे, गजानन ठवळी, प्रवीण काळमेघ, माधव टोपले, छोटू अब्रोल, भैया वानखडे, राजेश पाथरे, किशोर देशमुख, विलास चौधरी, प्रवीण कडू, निलेश तट्टे, राजेश मोंढे, पवन काळमेघ, निलेश बेहेरे, रुपेश राऊत, शुभम वसू, रोशन वानखेडे उपस्थित होते.
------------
छत्रीतलाव, दस्तुरनगर भागात आरटीपीसीआर
अमरावतवती: छत्री तलाव व दस्तुरनगर चौक येथे आरोग्य विभागाचे टीमद्वारे एकुण २१३ जणांची आरटीपीसीआर व सहा जणांची रॅपिड टेस्ट करून घेण्यात आली. २ जून रोजी स्वच्छता व आरोग्य विभागासह झोनने ही कारवाई केली. शहरात अनेक ठिकाणी अकारण फिरणारय्रांची तपासणी केली जात आहे.
------------
तीन नागरिकांना मास्क नसल्याने दंड
अमरावती: तोंडाला मास्क नसलेल्या तिघांकडून प्रत्येकी ७५० रूपये प्रमाणे एकुण २२५० रूपये इतका दंड
वसुल करण्यात आला. तसेच त्यांना मास्क वाटप करण्यात आले व कोविड १९ बाबत
जनजागृती करण्यात आली. सदर ठिकाणी स्वास्थ अधिक्षक विजय बुरे यांनी भेट दिली. २१ जून रोजी दस्तुरनगर भागात ही कारवाई करण्यात आली.
------------
संत गाडगे बाबा सायकल योजनेचे लोकार्पण
अमरावती : विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यापीठामध्ये कामानिमित्त येणा-या अभ्यागतांसाठी संत गाडगे बाबा सायकल योजना प्राधिकारिणीच्या निर्णयानुसार राबविण्यात आली असून या योजनेअंतर्गत पी.व्ही. इंडस्ट्रीज, हिंगणघाट यांचेकडून सामाजिक दायित्व निधी अंतर्गत प्राप्त तीन लक्ष रूपयाच्या निधीतून ५५ सायकली विद्यापीठाने खरेदी केल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.