सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:28+5:302021-06-05T04:10:28+5:30

कोरोनामुक्त गावासाठी हवे सहकार्य शिंदी बु :- कोरोना या महामारीचा पुन्हा एकदा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिंदी बु ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

कोरोनामुक्त गावासाठी हवे सहकार्य

शिंदी बु :- कोरोना या महामारीचा पुन्हा एकदा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिंदी बु व पोही गावातील नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, मास्कचा नियमित वापर करावा व कोरोनामुक्त ग्रामसाठी सहकार्य करावे असे आवाहन शिंदी बु. ग्रामपंचायतच्या सरपंच रजनी गजभिये यांनी केले आहे.

-------------

अंजनसिंगीत स्पर्धा परिक्षा कार्यशाळा

कु-हा : कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिगी येथे व्यक्तीमत्व स्पर्धापरीक्षा व आॅनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर यांनी त्यात २ जुन रोजी मार्गदर्शन केले. प्राचार्य भाऊराव गाढवे, दिपक अंबरते, सरला ढोले, उज्वला चांबटकर, किशोर देशकर, अमित धांद, नंदकिशोर बुरघाटे, मिनाक्षी भादककर, प्रतिभा सहारे, समिर कळसकर , गोपाल कांडलकर, विजय सोळंके, मधुसुदन झाडे व अतुल ठाकरे सहभागी झाले.

--------------

कोविडबाधितांच्या नातेवाईकांना भोजन

अमरावती: शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर, शिवसेना व सक्करसात मित्रमंडळीने कोरोनाने ग्रासलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ३ जुन रोजी जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली. कोविड हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, व पीडीएमसीला हे वितरण करण्यात आले.

--------------

माजी उपमहापौरांकडून कामाची पाहणी

अमरावती: अमर कॉलनीमधील फोडलेला रस्ता, गजानन महाराज मंदिर श्री कॉलनी, कमल प्लाझा मंगलकार्यालयापासून येणारा अर्धवट रस्ता, झोनच्या मागील अर्धवट नाली, या कामाचीमाजी उपमहापौर संध्या टिकले यांनी पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाचे अधिकारी त्यांच्यासमवेत होते.

--------------

कोरोनाच्या अनुषंगाने मदत अभियान

मोर्शी : रिलायन्स फाउंडेशन, ग्रीन नेचर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि प्रयास ह्यांचे संयुक्त विद्यमाने निराश्रित, अपंग, विधवा आणि समाजातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा येथून सुरवात करून परिसरातील अनेक गावातील गरजवंतांना अश्या वस्तूंचे गावोगावी जाऊन वाटप करण्यात येत आहे.

-----------

ुबेगमपुरा भागात तरूणाला मारहाण

अचलपूर: येथील बेगमपुरा भागात तेथीलच श्रीकांत चापे (३५ा याला काठीने मारहाण करण्यात आली. क्षुल्लक कारणावरून १ जुन रोजी हा वाद झाला. अचलपूर पोलिसांनी आरोपी नितीन चंदेले (बेगमपुरा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

एकपाळा येथून विद्युत तारा लांबविल्या

नांदगाव खंडेश्वर: तालुक्यातील एकपाळा येथून २ढ हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा लंपास करण्यात आल्या. ३० मे रोजी ही घटना घडली. नांदगाव पोलिसांनी आरोपी संकर्षण कांबळे, व निलेश नामक व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

येवदा बसस्टॅन्डवरून दुचाकी लंपास

येवदा: येथील बसस्टॅन्डवरून एमएच २७ एपी २२१९ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. २ जुन रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी रवींद्र देवकर (५५, वडनेर गंगाई) यांच्या तक्रारीवरून येवदा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.