सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:49+5:302021-06-09T04:15:49+5:30
येवदा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भामोद येथे गेंदालाल परदेशी यांना मारहाण करण्यात आली. शेतीच्या वादातून ५ जून रोजी ...
येवदा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भामोद येथे गेंदालाल परदेशी यांना मारहाण करण्यात आली. शेतीच्या वादातून ५ जून रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी येवदा पोलिसांनी आरोपी रामू गोरकू, सचिन गोरकू, नैतिक गोरकू व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका महिलेच्या तक्रारीवरून संतोष परदेशी, गेंदालाल परदेशी व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-------
माळीपुऱ्यात तरुणाला मारहाण, शिवीगाळ
चांदूर बाजार : येथील माळीपुरा भागात एका तरुणाला पाच जणांनी बेदम मारहाण केली. शिवीगाळ का करता, अशी विचारणा के ल्याने ४ जून रोजी रात्री ९.३० च्या सुमारास हा वाद झाला. याप्रकरणी जखमीचा भाऊ हेमंत खोटेले यांच्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी प्रियांशू काकडे, बंटी सावरकर, ............. काळे, ऋषी काटोले, प्रतीक सातपुते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------------
भालशी येथे तरुणाला मारहाण
भातकुली : तालुक्यातील ढंगारखेडा येथे मंगेश वर्धे (३३) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ५ जून रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास भालशी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपी मिलिंद वानखडे (ढंगारखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
महिलेचा विनयभंग
भातकुली : तालुक्यातील एका २८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. ५ जून रोजी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपी मंगेश माणिकराव वर्धे (३१, रा. ढंगारखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
अवैध रेतीसह ट्रॅक्टर जप्त
माहुली जहागीर : स्थानिक पोलिसांनी सावंगा ते नरसिंगपूर रोडवरून अवैध रेतीसह ट्रॅक्टर जप्त केला. ५ जून रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. एकूण जप्त माल पाच लाखांवर आहे. याप्रकरणी माहुली पोलिसांनी ट्रॅक्टरचालक अनिकेत हूड (२०, रा. देवरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------------
जामगाव येथे इसमाला मारहाण
शेंदूरजनाघाट : वरूड तालुक्यातील जामगाव येथील सुखराम घागरे (५५) यांना काठीने मारहाण करण्यात आली. ४ जून रोजी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपी जयराम उकार, हेमंत उकार व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----------------
सातनूर रोडवर शेतकऱ्याला मारहाण
शेंदूरजनाघाट : सातनूर रोडवरील गजानन खुंटाटे यांच्या शेताजवळ गोपाल होले (४०, रा. शेंदूरजनाघाट) यांना डोक्यावर व कानाजवळ दगडाने मारहाण करण्यात आली. जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ५ जून रोजी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला.
-----------------
सुरवाडी येथे अपघात, मुलगी जखमी
तिवसा : तालुक्यातील सुरवाडी येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत तृप्ती नरेश इंगळे (सुरवाडी) ही मुलगी जखमी झाली. २ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास ती रस्त्याने फिरत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी एमएच २७-४२७६ क्रमांकाच्या दुचाकीचा चालक संतोष खोपटकर (रा. तिवसा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
जळका जगताप येथे तरुणाला मारहाण
कुऱ्हा : चांदूर रेल्वे तालुक्यातील जळका जगताप येथे श्रीराम बगवे याला मारहाण करण्यात आली. घरकुलाच्या पैशाच्या वादातून ४ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपी विजय चौधरी (३५) व गावातीलच दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
महिलेचा विनयभंग, अश्लील शिवीगाळ
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. सोबतच अन्य एका महिलेलादेखील अश्लील शिवीगाळ करण्यात आली. ५ जून रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी आरोपी प्रदीप दशरथ इंगोले (रा. विहिगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
‘कोरोनाला निगेटिव्ह करण्यासाठी विचाराने पॉझिटिव्ह व्हा’
अमरावती : आता कोरोनाची दुसरी लाटसुद्धा ओसरत आहे. कोरोना बरा होऊ शकतो, मात्र कोरोनाला निगेटिव्ह करण्यासाठी विचारांनी पॉझिटिव्ह व्हा, असे आवाहन डॉ. आशिष लोहे यांनी केले. अमरावती येथील जाणीव प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोहे यांनी मार्गदर्शन केले.
----------------
पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाईन
चांदूर रेल्वे : येथील महिला कला, वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'कोरोना संसर्ग काळातील लॉकडाऊनचा पर्यावरणावरील परिणाम' या विषयावर डॉ. अरुणा पाटील यांच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सीमा जगताप होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अनिता धुर्वे उपस्थित होत्या.
------
फोटो पी ०७ कुºहा
कुऱ्हा येथे शिव स्वराज्य दिन
कुऱ्हा : येथील ग्रामपंचायतमध्ये शिवस्वराज्य अभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. सरपंच मीना नायर यांच्या हस्ते शिवशक, राजदंड चिन्हांकित गुढी उभारण्यात आली. उपसरपंच सलीम खान, सदस्य राजा बाभूळकर, प्रियंका शिंगाणे, मृणाली इंगळे, ज्योस्त्ना इखार, अनिता पटले, बाबाराव राऊत, अनिता जैतवार, भैयासाहेब इंगळे. ग्रामविकास अधिकारी प्रदीप भटकर, कर्मचारी संदीप तिंतुलकर, शेख रफीक, सुरेंद्र पवार, सुरेश सपाटे, अफसर बेग, रवींद्र कोठिया, इब्राहिम खान, रहीम आदी उपस्थित होते.
--------------
वृक्षपूजनाने वैवाहिक आयुष्याची सुरुवात
घोडगाव कविठा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दीपक देशमुख व चैताली आखरे या नवदाम्पत्याने वृक्षपूजन करून येणाऱ्या पावसाळ्यात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प करून आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. ग्रामस्थांनी त्यांच्या संकल्पाचे कौतुक केले आहे.
----------
म्युकरमायकोसिसचा पोस्ट कोविड शासनमान्य आजारात समाविष्ट करा
अमरावती : कोविड-१९ नंतर म्युकरमायकोसिस या पोस्ट कोविड आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा शासनमान्य आजारांच्या यादीत समावेश करून शिक्षक, शिक्षकेतर व इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती करण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष महेश ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व मुख्य सचिवांना केली आहे.
--------
फोटो पी ०७ अळणगाव ढ२
अळणगाव येथे शिवस्वराज्य दिन
भातकुली : तालुक्यातील अळणगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात गुढी उभारून, कोरोना नियमांचे पालन करून शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच गौतम खंडारे, उपसरपंच शंकर तायडे, ग्रामसेवक दिवाण, सचिन श्रीनाथ, पोलीस पाटील हरगोविंद इंगळे उपस्थित होते.