सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:31+5:302021-06-19T04:09:31+5:30
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथील नांदगाव प्लॉट भागातील शेख वसीम शेख निजाम यांच्या घरातून ४३ हजार ४०० ...
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथील नांदगाव प्लॉट भागातील शेख वसीम शेख निजाम यांच्या घरातून ४३ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १५ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी शेख वसीम यांच्या तक्रारीवरून मंगरुळ चव्हाळा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------
येवता येथे महिलेला मारहाण
आसेगाव : अचलपूर तालुक्यातील येवता येथील एका ४५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. १६ जुन रोजी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने हा प्रसंग घडला. याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी आरोपी बाळू नेतनराव व संदीप नेतनरावविरूद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
असदपूर कसबेगव्हाण मार्गावर चोरी
आसेगाव : असदपीर ते कसबेगव्हाण रोडवरू न अॅल्युमिनियमचे बंडल चोरीला गेले. त्या भागात लाईनचे काम सुरू आहे. ४ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी प्रशांत काळे (३०, असदपूर) यांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी संशयित म्हणून श्रावण अभ्यंकर, बाळासाहेब नितनवरे, विलास नितनवरे, सागर तायडे (वडगाव) विरूद्ध गुन्हे दाखल केले.
-------------------
माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ
नांदगाव खंडेश्वर : माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून पती व सासूने आपला शारीरिक व मानसिक छळ चालविल्याची तक्रार एका २८ वर्षीय विवाहितेने नांदगाव पोलिसांत नोंदविली. याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आरोपी संदीप पाळेकर व एक महिला (दोन्ही रा. कोल्हा, ता. बाभूळगाव) विरूद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
शेतशिवारात इसमाला मारहाण
अचलपूर : तालुक्यातील चमक खुर्द येथील सतीश माटे (४०) यांना गाय बांधण्याच्या जुन्या वादातून मारहाण करण्यात आली. १४ जून रोजी घडलेल्या याप्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी आरोपी गोवर्धन चरोडी, विवेक आखुड, विलास जाणे (सर्व रा. चमक) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-------------
कांडलीच्या नाईक प्लॉटमध्ये मारहाण
परतवाडा : येथील कांडलीस्थित नाईक प्लॉट भागात सचिन कळसकर (३०) याला मारहाण करण्यात आली. १६ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपी विलास बाबाराव कळसकर (कांडली) याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
अंबाडा येथे शासकीय कामकाजात अडथळा
परतवाडा : अंबाडा कंडारी येथे कार्यरत एका महिलेला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आला. १६ जून रोजी तलाठी कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून नागेश्वर पितांबर साहू (२८) व अन्य दोन (सर्व रा. वनश्री कॉलनी, परतवाडा) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
सोनोरी येथे जावयाला मारहाण
ब्राम्हणवाडा थडी : चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे वैभव गणोरकर (३०) याला सासरा व साळ्याने मारहाण केली. १३ जून रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी याप्रकरणी १६ जून रोजी विलास खवले, सूरज खवले (दोन्ही रा. सोनोरी) विरूद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
परतवाडा ते अचलपूर रोडवर अपघात
परतवाडा : येथील अचलपूर तहसीलजवळ एमएच १४ जीयू ५८१९ या कारच्या धडकेत दुचाकीस्वार मुलगा गंभीर जखमी झाला. २७ एप्रिल रोजी हा अपघात घडला होता. याप्रकरणी जखमीचे वडील अ. वसीम अ. ताहेर (परतवाडा) यांच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी कारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
----------------
थूगाव पिंपरी येथे शस्त्राने भोसकले
चांदूरबाजार : तालुक्यातील थूगाव पिंपरी येथे ६० वर्षीय व्यक्तीला धारदार शस्त्राने भोसकण्यात आले. १५ जून रोजी ही घटना घडली. चांदूरबाजार पोलिसांनी याप्रकरणी मुकद्दर खा गफुरखा, मुक्तारखा मुकद्दरखा व अन्य एक (सर्व रा. थूगाव पिंपरी) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
वाघपुरा येथे वृद्धेला मारहाण
अंजनगाव सुर्जी : येथील वाघपुरा भागात एका ७० वर्षीय महिलेला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. १५ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी महादेव भाऊराव वाघ (रा. वाघपुरा) विरूद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
वाघपुरा येथे इसमाला मारहाण
अंजनगाव सुर्जी : दारू पिण्याच्या वादातून महादेव वाघ (३९) यांना मारहाण करण्यात आली. १५ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी वनदेव पाखरे, कमलेश पाखरे, विकी पाखरे (वाघपुरा) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------
भंडारज शिवारातून केबल लंपास
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील भंडारज शिवारातून ५ हजार रुपये किमतीचा कॉपर केबल लंपास करण्यात आला. १५ जून रोजी ही घटना घडली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी रुपराव हुरबडे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
---------