सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:42+5:302021-06-19T04:09:42+5:30
अमरावती : घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्प, धारणी व भातकुली यांच्यातर्फे अंगणवाडी सेविकांना ...
अमरावती : घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्प, धारणी व भातकुली यांच्यातर्फे अंगणवाडी सेविकांना कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी आहारविषयक उपायावर आॅनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असणारे जीवनसत्त्व आणि त्यांच्या स्रोतांचे महत्?त्व सांगण्यात आले. यात धारणी आणि भातकुली तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
-----------
मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग कुठाय?
भातकुली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे गावातील नागरिक आता सर्रास विनामास्क फिरताना दिसतात. तर वाहनातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा अधिक आणि विनामास्क बसून प्रवास सुरु झाला. बाजारात आणि वर्दळीच्या ठिकाणी हीच अवस्था आहे. ना मास्क, ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्स अशी अवस्था आहे.
-------------------
दुकानासमोर गोल, मात्र गर्दी जैस ेथे
वरूड : मागील लॉकडाऊनमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी, ग्राहकांना दुकानांसमोर उभे राहण्याकरीता गोल वा चौकोनांची आखणी करण्यात आली. पण आता त्याचे पालन होत नाही. परिसरातील बसस्थानक, बाजारपेठ, शासकीय, निमशासकीय कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत असून कोणीच नियम पाळताना दिसत नाही.
-------------------
धामणगाव तालुक्यातील ग्रामीण घरकुलापासून वंचित
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये ‘ड’ घरकुलांची यादी प्रलंबित आहे. या वंचितांना घरकुल नसल्यामुळे पावसाळा उन्हाळा उघड्यावर काढावा लागतो. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. हातावर आणून पानावर खाणाºया या सर्वसामान्य गरिबांना घरकुल नाही. पावसाळ्यानंतर त्यांना घरकुल मिळाले नाही.
--------------------
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
अमरावती : रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाºया सुविधांचा वापर करून त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना प्रशिक्षण व रोजगार मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
------------
कडबी बाजार परिसरात वीज पुरवठा खंडित
अमरावती: महावितरणच्या कडबी बाजार वितरण केंद्र व आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याला तांत्रिक दोष कारणीभूत नसून मानवी हस्तक्षेपामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे. महावितरण वीज ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी बांधिल आहे परंतू नागरीकांनीही सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे.
--------------