सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:44+5:302021-08-21T04:16:44+5:30
अमरावती : चौधरी चौकातून एमएच २७ एडब्ल्यू ५५६१ क्रमांकाची दुचाकी १७ ऑगस्ट रोजी सकाळी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार ...
अमरावती : चौधरी चौकातून एमएच २७ एडब्ल्यू ५५६१ क्रमांकाची दुचाकी १७ ऑगस्ट रोजी सकाळी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार रितेश कुशवाह (रा. वनारसी) यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली. ते चौधरी चौकात दुचाकी लॉक करून कॉटन मार्केटमध्ये भेंडी विक्रीकरिता गेले होते. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
////////////
पिंपरी थुगाव येथून दुचाकी लंपास
चांदूर बाजार : तालुक्यातील पिंपरी थुगाव येथे घरासमोर उभी केलेली एमएच २७ बिके ०६३४ क्रमांकाची दुचाकी १२ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केली. सारंग रमेश खापरे यांनी चांदूरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
///////////
पार्सल घेण्याकरिता आला नि दुचाकी गमावून बसला
दर्यापूर : शहरातील एका हॉटेलवर पार्सल घेण्याकरिता गेलेल्या युवकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. एमएच २७ एझेड ५१४१ क्रमांकाच्या दुचाकीने वैभव अशोक काळे (३३, रा. गजानन टाउनशिप, अमरावती) हे अंजनगाव येथे गेले होते. परत येताना दर्यापूर येथील एका हॉटेलपुढे दुचाकी उभी करून ते पार्सल घेण्याकरिता आत गेले. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी पळविली. १४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. दर्यापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
///////////
दुचाकी चोराला रंगेहात पकडले
अंजनगाव सुर्जी : घरापुढे उभी केलेली दुचाकी चोरून नेत असताना एका युवकाला पकडण्यात आले. गणेश नगर येथे ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. अंकुश उत्तमराव खाडे (३३, गणेशनगर) यांनी एमएच २७ बीसी ०८३१ क्रमांकाची दुचाकी घरापुढे उभी केली होती. काही वेळाने बाहेर आल्यानंतर त्यांना दुचाकी जागेवर दिसली नाही. त्यांनी मित्रांसमवेत शोध घेतला असता नवीन बस स्टॅन्ड येथे रोशन बागडे (रा. हिरापूर) हा दुचाकी पळवून नेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याचा पाठलाग केला. यादरम्यान दुचाकी स्लिप झाल्याने रोशन कोसळला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. दवाखान्यात उपचार केल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अंजनगाव सुरजी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.