सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:13 AM2021-04-20T04:13:03+5:302021-04-20T04:13:03+5:30

वरूड : तालुक्यातील एका १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. १७ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

वरूड : तालुक्यातील एका १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. १७ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी सतीश साहेबराव कोकरे (१९, अंबाडा, ता. मोर्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

मोर्शी : येथील एका मंगल कार्यालयासमोर कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मुलगी गंभीर जखमी झाली. १७ एप्रिल रोजी सायंकाळी हा अपघात घडला. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी एमएच २७ एच ८१४४ क्रमांकाच्या कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

गिट्टी खदान परिसरातून बांधकाम साहित्य लंपास

मोर्शी : येथील गिट्टी खदान परिसरातील पालिकेच्या नवीन इमारतीच्या बांधकामस्थळाहून १६ हजार ५०० रुपये किमतीचे लोखंडी बार व १५ सिमेंट पोती लंपास करण्यात आली. १७ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी श्रीकांत ढोमणे (मोर्शी) यांच्या तक्रारीवरून आकाश रामपुरे (गिट्टी खदान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

चौकीदाराकडून ग्रामस्थाला मारहाण

धारणी: तालुक्यातील खाऱ्या टेंभरू फॉरेस्ट भागात तेथीलच घनश्याम राठोड यांना मारहाण करण्यात आली तथा त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यात आली. १७ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी फॉरेस्टचा चौकीदार रामनाथ धुर्वे याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

--------------

मांजरखेड कसबा येथे चोरी

चांदूरररेल्वे: तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील निजामशहा जबार शहा यांच्या घरातून ८५०० रुपयांच्या ऐवज चोरीला गेला. १६ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. चांदूर रेल्वे पोलिसांनी १७ एप्रिल रोजी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

बग्गी येथे तरुणाला मारहाण

तळेगाव दशासर : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बग्गी येथे मयूर गोपाल गिरी (२४) याला मारहाण करण्यात आली. आजोबाला मारण्यासाठी धजावलेल्या आरोपीला समजाविण्यास गेला असता, २६ मार्च रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी १७ एप्रिल रोजी आरोपी किशोर हरिभाऊ भारती (४०, बग्गी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

जळका पटाचे येथे मारहाण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील जळका पटाचे येथील अतुल ढुके (३५) याला काठ्यांनी मारहाण करण्यात आली. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. १७ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आरोपी मधुकर पंधराम, अंकुश पंधराम, हरीश पंधराम, प्रवीण पंधराम (सर्व रा. जळका पटाचे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

पेठेनगरमध्ये महिलेला मारहाण

धामणगाव रेल्वे : येथील पेठेनगर भागातील ४९ वर्षीय महिलेला मारहाण तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करण्यात आली. १७ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर रावेकर (५५) व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

दाभाडा येथे पुतणीला मारहाण

अंजनसिंगी : मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दी दाभाडा येथे एका मुलीस मारहाण करण्यात आली. आई व काकामध्ये होणारा वाद शमविण्याचा प्रयत्न करीत असताना १७ एप्रिल रोजी ही घटना घडली. करणी केल्याच्या कारणावरून हा वाद झाला. मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी आरोपी सुरेश थुले (५०, रा. दाभाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

चिखलदऱ्यात माकडांचा हैदोस

चिखलदरा : माकडांचा मोठा कळप चिखलदरा पर्यटनस्थळावरील विविध पॉईंटसह शहरात धुमाकूळ घालीत आहेत. त्यांच्या मर्कटलीलांनी पर्यटकांसह नागरिक कमालीचे दहशतीखाली आले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी अनेक निवेदने देऊनसुद्धा व्याघ्र प्रकल्प किंवा वनविभागातर्फे कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

-----------------

तळवेल येथे हत्तीरोगग्रस्तांना किटचे वाटप

तळवेल : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हत्तीपाय विकृती व्यवस्थापन व प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत साहित्य व किटचे वाटप करण्यात आले. चिकित्सालयप्रमुख एम.जी. मदनकर, डॉ. मिलिंद पाठक, डॉ. वर्षा डोंगरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाला पी.एस. मेहरे, अढाऊ, आरोग्यसेविका एस.एम.काळे, एस.जी. डोरले, एच.यू. बिजवे, हेमंत दिवाण, शेकार, मेटांगे, शीतल वासनकर, राठी, बावनेर यांची उपस्थिती होती.

------------

‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’त संत्रा प्रकल्प होईल?

मोर्शी व वरूड तालुक्यात अनेकदा संत्रा प्रकल्पांची घोषणा झाली. प्रत्यक्षात येथे संत्रा प्रकल्प आणण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. आता पुन्हा अत्याधुनिक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाली. अपेक्षा पल्लवित झाल्या असल्या तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारणार काय, अशी शंका संत्रा उत्पादकांना आहे.

--------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.