सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:13 AM2021-04-20T04:13:36+5:302021-04-20T04:13:36+5:30

अमरावती : शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे यांनी शाळा पाहणी दौरे केले. या दरम्यान बहुतांश शाळांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाची त्यांना उणीव ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

अमरावती : शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे यांनी शाळा पाहणी दौरे केले. या दरम्यान बहुतांश शाळांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाची त्यांना उणीव जाणवली. त्यावर विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा व शाळेची पटसंख्या वाढावी, या उद्देशाने प्रत्येक शाळेत व्होकेशनल कोर्सेस सुरू करणे आवश्यक आहे, असे मत आशिषकुमार गावंडे यांनी व्यक्त केले.

------------

गांधी नगर येथे पेव्हर ब्लॉक

अमरावती : प्रभाग क्रमांक १२ रुक्मिणी नगर, स्वामी विवेकानंद कॉलनी प्रभागामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. त्याकरिता प्रभागातील नगरसेविका तथा झोन सभापती नूतन भुजाडे यांच्या प्रभाग विकास निधीमधून ७ लाख रुपये मंजूर करण्यात आले.

------------

खोलापुरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

वाठोडा शुक्लेश्वर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक ठाणेदारांसह पोलीस रस्त्यावर उतरले. यावेळी विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. महसूल प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा ठाणेदार संघरक्षक भगत यांनी व्यक्त केली.

------------

क्रांती ज्योती ब्रिगेडच्या विदर्भ संघटकपदी किरण सोनार

करजगाव : क्रांती ज्योती ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या विदर्भ संघटकपदी समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष किरण सोनार यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदेश अंबाडकर यांनी केली. ओमप्रकाश अंबाडकर, किशोरानंद देशमुख, सुरेश वडनेरकर यांनी साेनार यांचे अभिनंदन केले.

----------

जीव मुठीत घेऊन शिक्षणसेवकांचे काम

अमरावती : शिक्षणसेवकांना प्रशासकीय कामे देण्यात आली आहेत. हे शिक्षणसेवक जीव मुठीत घेऊन काम करत असले, तरी त्यांना कोरोना संसर्ग झाला आणि दुदैर्वाने त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांना शासकीय मदत मिळणार नाही. त्यामुळे शिक्षण सेवकांना कोरोना कामात नियुक्तीवर घेऊ नये, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

------------

धारणी तालुक्यात दाम्पत्याला मारहाण

धारणी : तालुक्यातील भोंडीलावा येथील एका दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी सुरेश मनवर व एक महिला (दोघेही रा. धारणी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुल्लक कारणावरून हा वाद झाला.

------------

शेतीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण

धारणी : तालुक्यातील साद्राबाडी येथील मंगलसिंग कासदेकर (४०) याला गावातीलच सुकलाल कासदेकर व संदीप कासदेकर यांनी काठीने मारहाण केली. धारणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेतीच्या धुऱ्याच्या वादातून ही घटना घडली.

---------------

येरड ते चांदूरखेडा रस्त्याची दुर्दशा

चांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड ते चांदूरखेडा या नागपूर - औरंगाबाद सुपर एक्सप्रेस महामार्गापर्यंतच्या दोन किलोमीटर व येरड ते सुलतानपूर या ४ किलोमीटर रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण उखडून रस्त्याची गिट्टी बाहेर आली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.