सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:52+5:302021-04-21T04:12:52+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील दाभाडा झोपडपट्टीत राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेच्या घरातून ११ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १७ ते ...
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील दाभाडा झोपडपट्टीत राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेच्या घरातून ११ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १७ ते १८ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
सुरवाडीतून ५० हजारांचा ऐवज लंपास
तिवसा : तालुक्यातील सुरवाडी येथील वाॅर्ड क्रमांक २ मधील रहिवासी राहुल ठाकूर (३०) यांच्या झोपडीतून ३९ हजार ८०० रुपये रोख, चांदीचे कंगण, सोन्याची बाली असा एकूण ५० हजारांचा ऐवज चोरीला गेला. १७ ते १८ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
वडुरा शिवारातून कोंबड्या पळविल्या
कुऱ्हा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडुरा शिवारातून ३० कोंबड्या व ३ कोंबडे असे ६६०० रुपये किमतीचे पक्षी चोरून नेण्यात आले. १७ एप्रिल रोजी ही घटना घडली. विनायक पोकळे यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------------
चेनुष्टा येथून रोख लांबविली
तिवसा : तालुक्यातील चेनुष्टा येथील एका ३० वर्षीय महिलेच्या घरातून १७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या जिवत्या व ३० हजार रुपये रोख असा ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १८ एप्रिल रोजी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------------
वाढोणा शिवारातून धान्य लांबविले
तिवसा : तालुक्यातील वाढोणा शिवारातील उमेश काळमेघ यांच्या शेतातील खोपडीतून १५ क्विंटल सोयाबीन व सहा क्विंटल हरभरा असा ६९ हजार रुपयांचा धान्यमाल चोरीला गेला. १७ एप्रिलच्या रात्रीनंतर ही घटना घडली. याप्ररणी शंकर राठोड यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------------
वडनेर गंगाई येथे मारहाण
येवदा : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वडनेर गंगाई येथील शाहीदखाँ मुजाहिदखाँ याला मारहाण करण्यात आली. तुमची गाय येथे कशी काय आली, यावरून १८ एप्रिल रोजी हा वाद झाला. येवदा पोलिसांनी आरोपी गोपाल पांडे व जगन्नाथ पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गोपाल पांडेच्या तक्रारीवरून मुजाहिदखाँ व शाहिदखाँविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------
नारायणनगरात तरुणाला मारहाण
दर्यापूर : येथील नारायणनगर परिसरात प्रफुल सुधाकर सरोदे (३८, रा. गांधीनगर) याला मारहाण करून जखमी करण्यात आले. १८ एप्रिल रोजी जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी सागर ऊर्फ सोनू गावंडे (४०, रा. राठीपुरा) व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------------
जगतपूर येथे महिलेला मारहाण
नांदगाव खंडेश्वर : तुझा मुलगा उपसरपंच कसा झाला, त्याला काय समजते, असा जाब विचारून एका ४५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली तसेच तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी आरोपी श्याम कुणबीथोप (३०, रा. गोळेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील एका १४ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. १८ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी अंकुश बबनराव शिळके (२४, लोहगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
चार लाखांच्या बकऱ्या लांबविल्या
माहुली : नरसिंगपूर ते देवरा रोडवरील यावली शहीद शिवारातील चार लाख रुपये किमतीच्या बकऱ्या व बोकड लंपास करण्यात आले. १८ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी माहुली पोलिसांनी दामोदर पटके (रा. आनंदनगर, अमरावती) अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------
नायगाव शिवारातून ६०० फूट केबल लांबविला
वरूड : तालुक्यातील घोराड येथील हरिभाऊ वडस्कर यांच्या नायगाव शिवारासह तेथीलच अन्य पाच जणांच्या शिवारातून एकूण ६०० फूट केबल चोरीला गेला. १६ ते १७ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. वरूड पोलिसांनी याप्रकरणी १८ एप्रिल रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------------
परसोना शिवारातून जनावरे लांबविली
जरूड/बेनोडा : वरूड तालुक्यातील परसोना येथील माधव गोहोड यांच्या शिवारातील गोठ्यातून ३० हजार रुपये किमतीचे कालवड, गोऱ्हा व गाय लंपास करण्यात आली. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी १८ एप्रिल रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
खाऱ्या टेंभरू येथे वनकर्मचाऱ्याला मारहाण
धारणी : जंगलातील लाकूड तोडणाऱ्यास मनाई करणाऱ्या रामनाथ धुर्वे (४८) या वनकर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. १७ एप्रिल रोजी सकाळी खाऱ्या टेंभरू जंगलात ही घटना घडली. धारणी पोलिसांनी श्याम केशव राठोड व शिवचरण भालेराव (दोन्ही रा. खाऱ्या टेंभरू) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------
मनभंग येथे महिलेला मारहाण
चिखलदरा : तालुक्यातील मनभंग येथील ४५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. घरगुती वादातून ९ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी आरोपी रामलाल दहीकर (५०, रा. मनभंग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
अल्पवयीन मुलीला पळविले
अचलपूर : चांदूर बाजार तालुक्यातील तळेगाव मोहना येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करणारी तक्रार सरमसपुरा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. याप्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी १८ एप्रिल रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. ती मुलगी १२ एप्रिल रोजी आत्याच्या घरी जाते म्हणून घरातून निघून गेली.
------------------------
विश्रोळी येथून मुलीला पळविले
ब्राम्हणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी येथून एका मुलीला पळवून नेण्यात आले. १७ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
वणी बेलखेडा येथे महिलेला मारहाण
ब्राम्हणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा येथे एका ४९ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. १८ एप्रिल रोजी जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी स्वप्निल धाकडे, संकेत धाकडे व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.