सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:08+5:302021-04-23T04:13:08+5:30

अंजनगाव सुर्जी : येथील काठीपुरा भागातील सुधीर पेंडोखरे (३७) यांना घरगुती वादातून मारहाण करण्यात आली. १९ एप्रिल रोजी ही ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

अंजनगाव सुर्जी : येथील काठीपुरा भागातील सुधीर पेंडोखरे (३७) यांना घरगुती वादातून मारहाण करण्यात आली. १९ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी प्रभाकर पेंडोखरे, दीपक पेंडोखरे, भास्करराव पेंडोखरे (रा. काठीपुरा) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

पथ्रोटमध्ये तरुणाला मारहाण

पथ्रोट : अंजनगाव सुर्जी येथील मयूर रॉय (२५) याच्या डोक्यावर मारून जखमी करण्यात आले. १९ एप्रिल रोजी तो वाद सोडविण्यास गेला असता, ही घटना घडली. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी आरोपी विजय तुकाराम टेहरे (३५, रामापूर) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

जुन्या वैमनस्यातून डोके फोडले

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील सावनेर येथील नितीन हबडे यांचे काठीने डोके फोडण्यात आले. १८ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. नांदगाव पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अंकुश हबडे (३०, सावनेर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------------

३५ वर्षीय महिलेचा विनयभंग

येवदा : दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथील एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. १९ एप्रिल रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. येवदा पोलिसांनी आरोपी संतोष घनबहादूर (रा. पिंपळोद) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

वरूडमधून कूलरचा टप पळविला

वरूड : येथील सारंग शेरेकर (२४, वाॅर्ड क्र. ९) यांच्या दुकानातून कूलरचा टप चोरण्यात आला. १८ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर देखील गवसला. याप्रकरणी संशयित म्हणून तुषार गोहत्रे (४०, वरूड) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------------

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

वरूड : म्हशी आणण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावत २३ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. वरूड पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्र उईके, बाळू उईके व एक महिला (सर्व रा. अंबाडा) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------

खरपी येथे युवकाला मारहाण

शिरजगाव : चांदूरबाजार तालुक्यातील खरपी येथे संदीप वामन काळे (२३, रा. खरपी) याला मारहाण करण्यात आली. १८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शिरजगाव पोलिसांनी आरोपी रामप्रसाद रामू भुसूम (रा. खरपी) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

इसमावर कु-हाडीने हल्ला

चांदूराबाजार : तालुक्यातील खरपी येथील रामू भुसूम (५०) यांचेवर कु-हाडीने वार करण्यात आला. १८ एप्रिल रोजी वाद सोडविण्यास गेले असता, हा प्रकार घडला. शिरजगाव कसबा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संदीप वामन काळे (२३, खरपी) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

परतवाड्यातून पाण्याची मोटार लंपास

परतवाडा: स्थानिक रविनगर येथील विकी देविदास पवार यांच्या मालकीची ३ हजार रुपये किमतीची मोटार लंपास करण्यात आली. १६ ते १७ एप्रिलदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपी राज उईके व गोट्या आकोलकर विरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

दुचाकी अपघातात दाम्पत्य गंभीर

परतवाडा : येथील बैतुल स्टॉपस्थित एका पेट्रोलपंपासमोर दुचाकीने दिलेल्या धडकेत शेख युनूस शेख हबीब (३६, शिरजगाव) व त्यांची पत्नी जखमी झाली. १ एप्रिल रोजी हा अपघात घडला. याप्रकरणी १९ एप्रिल रोजी परतवाडा पोलिसांनी एमएच २७ सी एम ६२३२ या दुचाकीच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

मास्क न बांधणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

भातकुली : तालुक्यातील आसरा बसस्टॅन्डवर विनामास्क फिरणाऱ्या विकास थोरात (२८, रा. लोणीटाकळी) विरुद्ध भातकुली पोलिसांनी भादंविचे कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला. २० एप्रिल रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

------------------------

भातकुली बसस्टँडवर पोलिसांची कारवाई

भातकुली : येथील बसस्टॅन्डवर विनामास्क वावरणाऱ्या विशाल घोंगडे (२५, परलाम) विरुद्ध भातकुली पोलिसांनी भादंविचे कलम १८८, २६९ अन्वये गुन्हे दाखल केले. २० एप्रिल रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. मास्क का बांधला नाही, अशी विचारणा केल्यावरही त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

----------------

तळेगावात गुरांना मिळेना पाणी

तळेगाव दशासर : आठवडी बाजार येथे गुरांना पाणी पिण्याची व्यवस्था आहे. परंतु, नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्यामुळे गुरांना पाणी पिण्यास अडथळा निर्माण झाला आहे. काही जनावरे पाणी पिण्याच्या नादात या नाल्यामध्ये पडून जखमी झाले आहे. परंतु, येथील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.

-------------------

वाढत्या तापमानामुळे शीतपेयांची मागणी वाढली

येवदा : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमानात वाढ झाल्याने जीवाची लाही-लाही होत आहे. परिणामी, शीतपेयांच्या दुकानांत गर्दी दिसून येत आहे. तापमानात वाढ झाल्याने अनेक नागरिक शीतपेयांच्या दुकानांकडे वळत आहे. बहुतांश जण ऊसाच्या रसाला पसंती देत आहेत.

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.