सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:30+5:302021-04-23T04:13:30+5:30

भातकुली, गणोरीत होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप भातकुली : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा चिटनीस ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

भातकुली, गणोरीत होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

भातकुली : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा चिटनीस कुणाल विधळे व जिल्हा संघटक शैलेश राऊत यांच्यामार्फत भातकुली तालुका अध्यक्ष अमोल भारसाकळे, गणोरी व भातकुलीचे शहराध्यक्ष वैभव ठाकरे यांनी भातकुलीत होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप केले. यावेळी शैलेश राऊत, जावेद शेख, सुमित जगदाळे, राहुल वानखडे, आस्तिक पारसे, शाखीर अली, सागर शिरसाट, प्रनीत काजळे यावेळी उपस्थित होते.

---------

बबनराव जाधव

चांदूर रेल्वे : माजी पंचायत समिती सदस्य बबनराव डोमाजी जाधव (८७, सातेफळ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. मात्र, तो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. त्यांच्या पश्चात मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

---------

मोर्शी मतदारसंघासाठी दोन रुग्णवाहिका

वरूड : कोरोनाचा व इतर आजारांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना या कोरोना विरोधातील लढ्याला विविध संस्था, व्यक्ती यांच्या मार्फतही बळ दिले जात आहे. स्थानिक आमदारांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत वरूड, मोर्शी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी २ अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या.

---------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.