सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:12 AM2021-05-09T04:12:49+5:302021-05-09T04:12:49+5:30
दुर्गवाडा शिवारातून केबल वायर लंपास अमरावती : मोर्शी तालुक्यातील दुर्गवाडा शिवारातून १५०० रुपयांचा वायर लंपास करण्यात आला. ४ ते ...
दुर्गवाडा शिवारातून केबल वायर लंपास
अमरावती : मोर्शी तालुक्यातील दुर्गवाडा शिवारातून १५०० रुपयांचा वायर लंपास करण्यात आला. ४ ते ५ मे दरम्यान ही घटना घडली. मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी प्रकाश इंगळे (रा. दुर्गवाडा) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
उदखेडच्या अपघातग्रस्ताचा उपचारदरम्यान मृत्यू
अमरावती : मोर्शी येथील एका शाळेजवळ ११ मार्च रोजी झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताचा पुतण्या गोपाल तायडे यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध ६ मे रोजी गुन्हा दाखल केला.
----------------
‘त्या’ खून प्रकरणाला वैमनस्याची किनार
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील कासमपूर येथे ५ मे रोजी भुजंग ऊर्फ दिनेश सुधाकर सपकाळ याची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेला जुन्या वैमनस्याची किनार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी येवदा पोलिसांनी ६ मे रोजी बलराम नरोकार (२४) व जगन्नाथ नरोकार (५१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृताने सात आठ महिन्यांपूर्वी आरोपींच्या दारूच्या धंद्याची माहिती पोलिसांना दिली होती.
-----------
कोतेगाव येथे इसमाला मारहाण
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतेगाव येथे विष्णू वानखडे यांना मारहाण करण्यात आली. पत्नीला शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारला असता, ६ मे रोजी ही घटना घडली. खल्लार पोलिसांनी आरोपी विनोद वानखडे, अक्षय वानखडे, राहुल वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
कुसुमकोट येथे महिलेला चावा
धारणी : तालुक्यातील कुसुमकोट येथील एका २७ वर्षीय महिलेच्या अंगठ्याला चावा घेण्यात आला तथा शिवीगाळ करण्यात आली. ६ मे रोजी सकाळी ही घटना घडली. धारणी पोलिसांनी आरोपी राजेश कासदेकर (रा. कुसुमकोट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
कुष्टा येथे कुटुंबातील चौघांना मारहाण
पथ्रोट : अचलपूर तालुक्यातील कुष्टा येथे मो. जाकीर मो. याकुब (५८) यांना काठीने मारहाण करण्यात आली. त्यांच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करण्यात आला. मुलांनादेखील काठीने मारहाण करण्यात आली. ५ मे रोजी जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. पथ्रोट पोलिसांनी मो. सादिक शेख इस्माईल, मो. इमरान, मो. साजिद व एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मो. सादिक यांच्या तक्रारीवरून मो. जाकीर, मो. सलमान, मो. शाहरूख, मो. फारूख (सर्व रा. कुष्टा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
वडुरा शिवारात शेतीसाहित्याची चोरी
अमरावती : चांदूर बाजार येथील अतुल तिडके यांच्या वडुरा शिवारातील शेतातून सब्बल व पाने, संजय अग्रवाल यांच्या शेतातून १६ नोझल स्प्रिंकलर तसेच बंडू साखरकर, राजेंद्र काळे, मंगेश गावंडे व राजेंद्र कडू यांच्या शेतातून बोअर केबल लंपास करण्यात आला. ६ मे रोजी पहाटे ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
सर्फाबाद येथे शेतकऱ्याला मारहाण
चांदूर बाजार : तालुक्यातील सर्फाबाद येथे उत्तमराव भानगे (४५) यांना मारहाण करण्यात आली. ६ मे रोजी १०.३० वाजता हा प्रकार घडला. कुटाराची मजुरी घेण्याकरिता गेले असता, हा प्रकार घडला. चांदूर बाजार पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रदीप भानगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----------------
संगेकरनगरमधून दुचाकी लंपास
चांदूर बाजार : येथील संगेकरनगरमधून एमएच २७ ए झेड ३८१३ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. ६ मे रोजी दुपारी ही घटना घडली. शुभम लोणारे (२८) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
मांडवा शिवारातील झोपडीला आग
चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांडवा शिवारातील नारायण इटनकर यांच्या मालकीच्या झोपडीला अज्ञात इसमाने आग लागली. त्यात १५ हजारांचे शेती साहित्य जळाले. ५ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
कवठा कडू येथे मारहाण
चांदूर रेल्वे : तालुक्यातील कवठा कडू येथे अमोल सुरेश कडू (४०) यांना लोखंडी सळाखीने मारहाण करण्यात आली. २१ एप्रिल रोजी ही घटना घडली. चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी गणेश कडू, प्रतीक कडू व मनोज कडू (रा. कवठा कडू) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जुनी केस मागे घे, या कारणावरून हा वाद झाला.
---------------
विवाहितेवर बलात्कार
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय विवाहितेच्या घरात शिरून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. वाच्यता केल्यास कुटुंबाला मारण्याची धमकी देण्यात आली. २ मे रोजी ही घटना घडली. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नितीन ठाकरे (२८, रा. मंगरुळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
--------------
शिरजगाव मोझरी येथे मारहाण
तिवसा : तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील एका इसमाला सब्बल व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ५ मे रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपी अमर वाघमारे (३२) व संदीप वाघमारे (४०, दोघेही रा. शिरजगाव मोझरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
अमरावती विभागात भरणार ग्रामीण डाक सेवकांची ८७ पदे
अमरावती : भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमार्फत ग्रामीण डाकसेवकांची एकूण २ हजार ४२८ पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांपैकी ८७ पदे अमरावती विभागातील आहेत. या भरतीत शाखा पोस्ट मास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर व डाक सेवकांची पदे भरली जाणार आहेत.
------------
फोटो पी ०८ मनपा
विनाकारण फिरत असलेल्यांची तपासणी
अमरावती: भाजीबाजार चौक या ठिकाणी मोबाईल आरोग्य विभागाचे टीमद्वारे अकारण फिरणाऱ्या ४६ जणांची आरटी-पीसीआर टेस्ट करून घेण्यात आली. सहायक आयुक्त भाग्यश्री बोरेकर व प्राची कचरे, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक विकी जेधे, स्वास्थ निरीक्षक सी.आर. पछेल, ए.एम. सैय्यद, जीवन राठोड, मनीष नकवाल, मोहित जाधव, आवेश शेख, प्रसाद कुलकर्णी, धर्मेंद्र डिके उपस्थित होते.
------