सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:12 AM2021-04-25T04:12:21+5:302021-04-25T04:12:21+5:30
आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर अमरावती : आझाद हिंद मंडळातर्फे मंडळाचे कार्यकर्ते सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन ...
आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर
अमरावती : आझाद हिंद मंडळातर्फे मंडळाचे कार्यकर्ते सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन १ मे रोजी स्व. हरीभाऊ कलोती स्मारक आझाद हिंद मंडळ येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रक्ताची गरज लक्षात घेऊन हे शिबिर होत आहे.
-----------
कोविड कर्तव्यावरील शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच हवे
अमरावती : कोरोना काळात अध्यापनाव्यतिरिक्त प्रशासनाकडून नेमून दिलेल्या आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील कर्तव्य करत असताना ३१ डिसेंबर २०२० नंतर कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लक्ष रुपयांची विमा रक्कम मिळावी, अशी मागणी प्रहारचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
---------
जहागिरपूर येथे घाणीचे साम्राज्य
कु-हा : तिवसा तालुक्यातील मारडा जहागिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्र. ३ मधील श्रीक्षेत्र जहागिरपूर येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. श्री. महारूद्र मारोती संस्थानच्या पावन भूमित मूलभूत सोई सुविधा व स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. श्रीक्षेत्र जहागीरपूर भाविकांचे श्रध्दास्थान असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनाकरिता येतात. परंतु येथे ग्रामपंचाय अंतर्गत अस्वच्छता दिसून येत आहे. सगळीकडे नाल्या उपसण्याच्या कामात अनियमितता झाल्याची ओरड आहे. त्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावर वाहत आहे. कोरोना काळात सरपंच, सदस्यांचे गावाकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे.
---------
मोर्शीत ऑनलाईन व्याख्यानमालेचे सत्र
मोर्शी : लॉकडाऊन काळात शिक्षक हा निराशेत न जाता त्याच्या विचारांना चालना मिळावी, यासाठी जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाट येथील उपक्रमशील शिक्षक अतुल पडोळे व वसंतराव नाईक हायस्कूल, जरूड येथील शिक्षिका सुषमा मानेकर यांच्या संकल्पनेतून व नियोजनातून महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम समितीद्वारा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. त्यात अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत.
-----