सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:11 AM2021-04-26T04:11:04+5:302021-04-26T04:11:04+5:30
तिवसा : तालुक्यातील सातरगावकडे जाणाºया कॅनललगतच्या पुलाजवळून एमएच २७ - ३५३७ या क्रमांकाचा ट्रॅक्टर रेतीसह जप्त करण्यात आला. २३ ...
तिवसा : तालुक्यातील सातरगावकडे जाणाºया कॅनललगतच्या पुलाजवळून एमएच २७ - ३५३७ या क्रमांकाचा ट्रॅक्टर रेतीसह जप्त करण्यात आला. २३ एप्रिल रोजी रात्री दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तिवसा पोलिसांनी याप्रकरणी चालक राहुल राघोते (रा. तळेगाव ठाकूर) व मालक धीरज ठाकरे (रा. तिवसा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------------
देवगाव येथे मारहाण
तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे तालुक्यातील बारमध्ये जेवण करण्यास गेलेल्या उमेश डोंगरे (४४, रा. अमरावती) यांना मारहाण करण्यात आली. २२ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी अमोल इंगळकर व अन्य एक (दोन्ही रा. देवगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------------
भंडारज येथे तरुणावर चाकुहल्ला
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील भंडारज येथील चंदू राक्षसकर (२५) याच्यावर गावातीलच एकाने चाकूने हल्ला केला. उधारीच्या पैशांवरून २३ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी अमजदखाँ हमीदखाँ पठाण व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------------
दर्यापुरात पादचारी इसमाला धडक
दर्यापूर : येथे पहाटे ५.३० च्या सुमारास बाहेर फिरत असलेल्या एका इसमाला दुचाकीस्वाराने धडक दिली. १२ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी जखमी व्यक्तीचा पुतण्या संतोष राऊत यांच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी सुनील दुधांडे (३०, जहानपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------------------
धोतरखेड्यात तरुणाला चाकूने भोसकले
परतवाडा : लगतच्या धोतरखेडा येथे भर चौकात भांडण करून एका तरुणाला चाकूने भोसकण्यात आले. २२ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी जखमीचा भाऊ शेख अय्याक शेख रज्जाक यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी शेख गोलू शेख कय्युमविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
अपघातग्रस्त इसमाचा उपचारदरम्यान मृत्यू
परतवाडा: गौरखेडा कुंभी येथे अज्ञात दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनोद रतनलाल यादव (४८, रा. गौरखेडा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------------
घरगुती वादातून पत्नीला गंभीर मारहाण
परतवाडा : घरगुती कारणावरून एका महिलेला तिच्या पतीने जबर मारहाण केली. तिला दवाखान्यात हलविण्यात आले आहे. बेलखेडा येथे २३ एप्रिल रोजी ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी जखमी महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी मोहन कासदेकर (रा. बेलखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------------
बागलिंगा येथे मुलीला भोसकले
चिखलदरा : तालुक्यातील बागलिंगा येथील एका १७ वर्षीय मुलीसह वाद सोडविण्यास आलेल्या तिच्या वडिलांना चाकूने भोसकण्यात आले. २२ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी आरोपी अजय धांडेकर (२२, रा. बागलिंगा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
घोडचंदी येथे शेतकऱ्याला मारहाण
येवदा : दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी येथे राजेश वडाळ (३९) यांना मारहाण करण्यात आली. २३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. येवदा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी उमेश कडू (रा. घोडचंदी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. उमेश कडू यांच्या तक्रारीवरून राजेश वडाळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
थिलोरी येभे मोठ्या भावाला मारहाण
दर्यापूर : तालुक्यातील थिलोरी येथे बाबूलाल काशीनाथ राऊत (३८) याला लहान भाऊ रवींद्र राऊत याने कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. आरोपी हा जुगार खेळतो, ही बाब मावशीला का सांगितली, यातून २३ एप्रिल रोजी ही घटना घडली. दर्यापूर पोलिसांनी आरोपी रवींद्रविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
सालबर्डी येथे आढळला मृतदेह
मोर्शी : नजीकच्या हिवरखेड येथील एका ६७ वर्षीय वृद्धाचा मृतदेह मध्य प्रदेश हद्दीत श्रीक्षेत्र सालबर्डी येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळ आढळून आला. उत्तम शंकरराव परोटकर (६७) यांना २०१७ साली कारागृहात सोडण्यात आले. चार वर्षांनंतर त्याचा मृतदेह मध्य प्रदेश हद्दीत असलेल्या सालबर्डी येथे आढळून आला. पुढील तपास आठनेर पोलीस करीत आहेत.
------------------
फोटो पी २५ मोर्शी
रस्त्याच्या कडेला सापडलेले ९७ हजार परत
मोर्शी : आजही प्रामाणिकपणा कायम असल्याची प्रचिती येथे आली. दापोरी ते मायवाडी दरम्यान झाडांना पाणी टाकण्याकरिता रामदास गोमाजी जिचकार नामक मजूर नाल्यावर गेला असता, त्याला ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चिखलात आढळून आले. जिचकार यांनी त्याबाबत वनपाल एस.एस. काळे यांना माहिती दिली. जिचकार व फरकाडे यांनी त्या नोटा मोर्शीचे ठाणेदार संजय सोळंके यांच्या हवाली केल्या. ती रक्कम ९७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोळंके यांनी दिली. ठाणेदारांनी जिचकार यांचे कौतुक केले.
------------------
रिद्धपूर येथे कोरोना चाचणी शिबिर
रिद्धपूर: गावातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल रोजी येथे कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. यात ६० ग्रामस्थांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यावेळी प्रयोगशाळा अधिकारी जितेश ढेवले, डॉ. हातगुडे, आर.डब्ल्यू. मालवे, सुधीर बडगे, नलिनी श्रीराव, रामटेके यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले.
----------
१ मे रोजी विद्यापीठातर्फे सत्कार
अमरावती : सत्र २०१९-२० मधील निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट कलावंत मुले व मुली, राष्ट्रीय कव्वाली, मध्य विभाग व अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त चमूतील स्पर्धक, कलावंत, साथीदार व चमू व्यवस्थापक यांचा कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. सत्कार समारंभाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाद्वारे १ मे रोजी आभासी पद्धतीने करण्यात आले आहे.
---------