सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:21+5:302021-04-26T04:12:21+5:30
अमरावती : उन्हाची तीव्रता वेगाने वाढत असल्याने कोरोना काळातही अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी तीव्र उन्हाची दाहकता शमविण्यासाठी ...
अमरावती : उन्हाची तीव्रता वेगाने वाढत असल्याने कोरोना काळातही अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी तीव्र उन्हाची दाहकता शमविण्यासाठी शीतपेयांकडे धाव घेतली जात आहे. मात्र, संचारबंदीमुळे दुकाने बंद असल्याने जवळ बाळगलेले कोमट पाण्यावर तहाण भागविण्याची वेळ आली आहे.
------------
लॉकडाऊनचे कठोर पालन, रस्ते निर्मनुष्य
अमरावती : दुपारी १२ ते ४ वाजतादरम्यान लॉकडाऊनचे कठोर पालन केले जात असल्याची प्रचिती रविवारी आली. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळल्याने रविवारी दुपारी रस्ते निर्मनुष्य झालेले दिसून आले.
-----------------
बाजार समितीत शेतमालाची आवक घटली
अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना ग्रामीण भागात त्याचा प्रसार वाढताच असल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षिततेचा पवित्रा घेत शेतमाल विक्रिकरिता आणण्याचे टाळत आहे. त्यामुळे बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याचे सूत्रांनी सांगितले.
----------------------------
यंदा पाणपोईचे दर्शनच नाही
अमरावती : उन्हाळ्याची चाहुल लागताच सामाजिक संघटनांसह समाजसेवेचा वसा घेतलेल्या अनेकांकडून पाणपोईचे उद्घाटन पार पडत होते. मात्र, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने बाहेरील पाणी सुरक्षित की असुरक्षित, या संभ्रमातून कुणीही पाणपोईवर पाणी पिण्यास जात नसल्याने यंदा कुठेच पाणपोई दिसत नसल्याचे चित्र आहे.