सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:12 AM2021-04-27T04:12:25+5:302021-04-27T04:12:25+5:30

पथ्रोट : श्रीराम सेनेच्यावतीने रामनवमी व जयसिंग महाराज पुण्यतिथी निमित्त जयसिंग महाराज सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

पथ्रोट : श्रीराम सेनेच्यावतीने रामनवमी व जयसिंग महाराज पुण्यतिथी निमित्त जयसिंग महाराज सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे, डॉ. अमोल पवार, श्रीकृष्ण गोरडे, संगीता गोरडे, रितेश नवले, रवींद्र हरणे, श्रीकांत मेहश्रे, मनीष राऊत उपस्थित होते. ५० तरुणांनी रक्तदान केले. या रक्तदानाचे आयोजन श्रीराम सेनेचे अध्यक्ष लोकेश लामखाडे, अंकुश नवले, वैभव अंबाडकर, मिथिलेश काळे, नृपेन पाटील, अमोल पवार, सुशांत गावंडे, प्रणव हावरे, अमोल माहुलकर, रोहित हरणे, अनिकेत अंबाडकर, प्रतीक उंबरकर, रोशन हाडोळे, हिमांशू लांडे यांनी केले.

-----------

फोटो पी २६ मोर्शी

दापोरीत त्या मजुराचा सत्कार

मोर्शी : शनिवारी सकाळी दापोरी ते मायवाडी दरम्यान असलेल्या नाल्यात सापडलेले ९७,५०० रुपये प्रामाणिकपणे मोर्शी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर दापोरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकांनी देखील मजूर रामदास जिचकार यांचा सन्मान केला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगीता ठाकरे, तलाठी सोनटक्के, ग्रामसेवक कोंडे आणि पोलीस पाटील नंदकिशोर नवघरे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सामाजिक वनीकरण विभागात काम करणारे मजूर रामदास जिचकार यांचा सन्मान करण्यात आला.

---------------------

तळेगाव ठाकूर येथील नेर पांदण रस्त्याची दुरवस्था

तळेगाव ठाकूर : येथील नेर पांदण रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. या पांदण रस्त्याने जाणारा शेतकरी सहजरीत्या आपल्या शेतापर्यंत पोहोचू शकत नाही. रस्त्याने अनेक प्रकारचे खड्डे, दगड, रस्ता अरुंद असणे अशा अनेक प्रकारच्या अडचणींमुळे शेतीपयोगी साहित्य तसेच शेतमाल आणण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

--------

कला व विज्ञान महाविद्यालयात वसुंधरा दिवस

कु-हा : येथील कला व विज्ञान महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिवस आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सिनेट सदस्य ओमप्रकाश मुंदे, प्राचार्य अरविंद देशमुख, सुनील आखरे यांनी आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिवसाचे महत्त्व विशद केले. संचलन तसेच आभार प्रदर्शन किशोर ताकसांडे यांनी केले. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची शपथ सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतली.

----------------

दापोरीत २३ कोरोना संक्रमित रुग्ण

मोर्शी : तालुक्यातील दापोरी येथे ग्रामपंचायतीच्यावतीने रॅपिड अँटिजेन चाचणी शिबिर घेण्यात आले. यात ११० नागरिकांची तपासणी करण्यात आली. पैकी २३ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. यापूर्वी १० कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या घरावर फलक लावण्यात आले. या सर्व कोरोना बाधित रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले आहे. विविध भागांत ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली .

------------

‘संत तुकाराम यांचे विचारधन वर्तमानाला प्रेरक’

मोर्शी : जगद्गुरू संत तुकाराम यांचे विचारधन वर्तमानाला प्रेरक असल्याचे मत डॉ. ननदा भोर यांनी व्यक्त केले. जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाट येथील शिक्षक अतुल पडोळे व वसंतराव नाईक हायस्कूल, जरूड येथील शिक्षिका सुषमा मानेकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम समितीद्वारा आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी मोहन शिरसाट, वाशिम उपस्थित होते. संचालन शेवाळे तर, प्रास्ताविक वैशाली आडमुठे यांनी केले.

------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.