सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:13 AM2021-04-27T04:13:09+5:302021-04-27T04:13:09+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी प्र. वित्त व लेखा अधिकारी रवि पिंपळगावकर यांची नुकतीच सन २०२१ ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी प्र. वित्त व लेखा अधिकारी रवि पिंपळगावकर यांची नुकतीच सन २०२१ ते २०२६ या कालावधीकरिता विदर्भ साहित्य संघाच्या मानद सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर व कार्यकारिणी सदस्य यांनी त्यांची विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीवर नामित सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

-----------

आसरा सर्कलमधील रस्ते नादुरुस्त

गणोरी : भातकुली तालुक्यातील आासरा जिल्हा परिषद सर्कलमधील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यापैकी आसरा - कावसा जोडरस्ता, गणोरी-बहाद्दरपूर, शिवणी-खरबी-शिपगाव-बहाद्दरपूर, पेढी काँर्टर-बहाद्दरपूर आदी रस्ते हे विनापरवाना जड वाहतूक केल्याने अत्यंत खराब झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष चालविले आहे.

-------------

मेळघाटमधील पाणीसमस्या निवारण करा

अमरावती : मेळघाट आदिवासीबहुल क्षेत्रासह इतर तालुक्यातील पाणीटंचाईची कामे त्वरित करण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आजही मेळघाटात पिण्याचे पाणी लांब अंतरावरून पायी जाऊन आणावे लागत आहे. कोरोना काळात तीव्र पाणीटंचाई उदभवू शकेल, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली.

--------------

वीजग्राहकांना स्वत:हून पाठविता येणार मीटर रिडींग

अमरावती : वीजग्राहकांना स्वत:हून दरमहा मीटर रिडींग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रिडींग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांना मीटर रिडींग पाठविता येईल. महावितरण मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी स्वत:हून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन मुख्य अभियंता अमरावती परिमंडल सुचित्रा गुजर यांनी केले आहे.

-------

आरोग्य केंद्राची इमारत पूर्णत्वास

पथ्रोट : जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, आरोग्य सभापती यांच्या प्रयत्नाने येथील आरोग्य केंद्राची इमारत पूर्णत्वास गेली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना अंतर्गत ५ कोटी ६० लक्ष रुपयांच्या निधीतून वीजपुरवठा व फर्निचरचे काम करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी सर्वसामान्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.

-----------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.