सारांश न्युज इनबॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:29+5:302020-12-22T04:13:29+5:30

वरूड ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया वरूड: येथील ग्रामीण रुग्णालयात २२ रुग्णांवर अंडवृद्धी शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक ...

Summary News Inbox | सारांश न्युज इनबॉक्स

सारांश न्युज इनबॉक्स

googlenewsNext

वरूड ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया

वरूड: येथील ग्रामीण रुग्णालयात २२ रुग्णांवर अंडवृद्धी शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, शल्यचिकित्सक प्रवीण बिजवे व रमेश डकरे यांनी या शस्त्रक्रिया केल्या. आयोजन प्रवीण चकुले, सुधाकर चोपकर व आरोग्य कर्मचारी प्रकाश दातीर यांनी केले. आरोग्य सहाय्यक सुनील वाडीकर, सुधाकर राऊत, अनिल आगरकर, किसन नेवारे व विनायक नेवारे यांनी सहकार्य केले.

-------------------

फोटो पी २१ विनायक देशमुख

निधन वार्ता

विनायक देशमुख

दर्यापूर : सहकारनेता विनायकराव किसनराव देशमुख (७३, रा. लासूर) यांचे २० डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. जिल्हा बँकेच्या स्थानिक शाखेतील कर्मचारी प्रदीप देशमुख तथा सेवा सहकारी सोसायटीचे सचिव शंतनु देशमुख यांचे ते वडील होत.

---------

ढाकरमल येथे गाडगेबाबांना अभिवादन

धारणी : ढाकरमल येथील संत गाडगेबाबा प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानदेवराव पाटील, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. गरजूंना उबदार कपड्यांचे वितरण करण्यात आले.

----------------

बुधवारा जवाहरगेटमध्ये नाली दुरुस्ती

अमरावती : बुधवारा जवाहरगेट प्रभागामध्ये अंबागेट ते पटवीपुरा, माता खिडकी ते महाजनपुरा गेट, बहिरमबाबा परिसर ते एकवीरादेवी, खरकाडीपुरा ते खोलापुरी गेट, बुधवारा ते निळकंठ चौकापर्यंत सिमेंट रोडची दुरुस्ती, जुनी टाकसाळ येथे नाली व त्यावर स्लॅब टाकणे, बुधवारा येथे काँक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे.

----------------------------------

वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची कार्यकारिणी

तळवेल : वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी अमर वानखडे व जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आभा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तुषार देशमुख, सुधाकर सरकचौरे, अजित पाटील, समीर लेनगुळे, प्रतीक काटोलकर, तालुकाध्यक्ष गौरव भोकसे, अजित काळबांडे, अनूप देशमुख उपस्थित होते.

----------

Web Title: Summary News Inbox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.