सारांश पान ३ साठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:43+5:302021-02-07T04:12:43+5:30
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ढेंगळा येथील नागरिकांची जमीन निम्नसाखळी पाटबंधारे प्रकल्पासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आली होती. त्यावेळी ...
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ढेंगळा येथील नागरिकांची जमीन निम्नसाखळी पाटबंधारे प्रकल्पासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आली होती. त्यावेळी सदर गावातील जागा ज्या नागरिकांच्या मालकीच्या होत्या त्यांच्याऐवजी त्याच जागेवर अतिक्रमण करून रहिवासी झालेल्या नागरिकांच्या नावाने सदर जागेचा मोबदला मिळाला. तो मोबदला जागेच्या मूळ मालकांच्याच नावे देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
------------
अचलपूर तालुक्यात ‘एक दिवस पीक पाहणीचा'
शिंदी बु :अचलपूर तालुक्यामध्ये ई पीक पाहणी हा प्रकल्प राबवला जात आहे. या माध्यमातून यंदाच्या रबी हंगामातील पिकांची नोंद करण्यासाठी सोमवार ८ फेब्रुवारी रोजी ‘एक दिवस पीक पाहणीचा’ ही विशेष मोहीम महसूल व कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणार आहे.
-------------------
फोटो पी ०६ किसान
दर्यापुरात संयुक्त किसान मोर्चाचा चक्काजाम
दर्यापूर : केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी आणि दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून दर्यापूर येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी अभय गावंडे, अभिजीत देवके, अरविंद घाटे, नमित हुतके, रवि कोरडे, अमोल गहरवार, गणेशराव साखरे, प्रवीण कावरे, प्रभाकर गहले, अर्जुन पातुर्डे, नीलेश कातखेडे, प्रभाकर मोहोड, अब्दुल अबीद, मिथुन आठवले, प्रशांत मोहोड, देवा गावंडे, राजेश मोहोड, अनूप गावंडे, वैभव तिमाने, अंकुश गावंडे, प्रतीक नाकट, नितीन गावंडे, गौरव गावंडे, हर्षल काळे, अक्षय गावंडे, विवेक खंडारे, नंदू इंगोले, प्रज्ज्वल शेळके, शिवराज टोळे, हर्षद ठाकरे यांचे सह संयुक्त किसान मार्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------
वाहनचालक त्रस्त, रस्ता दुरुस्तीची मागणी
टाकरखेडा संभु : आष्टी फाटा ते टाकरखेडा संभु या चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. किरकोळ अपघात वाढले आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.
--------------
परतवाडा येथे माऊली सरकार यांचा सत्कार
टाकरखेडा संभु : कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्य माऊली सरकार यांनी ग्राम जोडो अभियानाला सुरुवात केली आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या भेटीनंतर परतवाडा येथे त्यांचा सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
-------------
जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक समितीचे
स्पेशल युनिट
अमरावती: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षक मेळावा नुकताच पैठण येथे घेण्यात आला.त्यात २००५ नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांसाठी व जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक समितीचे राज्यस्तरीय स्पेशल युनिट लवकरच स्थापन करण्यात येणार असून त्यात राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील शिक्षकांचा सहभाग असेल, असे ठरविण्यात आले.
-------------