सारांश ग्रामीण वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:48+5:302021-07-15T04:10:48+5:30

प्राप्त तक्रारीवरून, जरूड येथील आशिष शेंडे यांची बहीण अश्विनी हिचा विवाह कैकाडीपुरा येथील सतीश पांडुरंग माहुरे याच्याशी सन २०१० ...

Summary Rural News | सारांश ग्रामीण वृत्त

सारांश ग्रामीण वृत्त

googlenewsNext

प्राप्त तक्रारीवरून, जरूड येथील आशिष शेंडे यांची बहीण अश्विनी हिचा विवाह कैकाडीपुरा येथील सतीश पांडुरंग माहुरे याच्याशी सन २०१० मध्ये झाला. मात्र, चार वर्षांपासून सतीश याला दारुचे व्यसन जडल्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत होता. त्याला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिचा भाऊ आशिष याने परतवाडा पोलिसात दिली. यावरून पोलिसांनी आरोपी सतीश पांडुरंग माहुरे, संतोष माहुरे, सचिव माहुरे, कमलाबाई माहुरेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------

दारू पिऊन घरी आल्याने युवकाला मारहाण

चांदूर बाजार : दारू पिऊन घरासमोर बसल्याने त्याला शिवीगाळ केली व काठीने मारहाण केल्याची घटना फुबगाव येथे १३ जुलै रोजी घडली. अमित ज्ञानेश्वर किटुकले यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी नीलेश पळसपगारविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------

भरधाव दुचाकीच्या धडकेच महिला जखमी

पथ्रोट : दवाखान्यात उपारार्थ निघालेल्या महिलेला भरधाव व निष्काळजीपणे येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक देऊन जखमी केल्याची घटना १३ जुलै रोजी पथ्रोट टाऊन येथे घडली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय मनोज शहारे (२७, रा. परतवाडा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

विहिरीतील पानबुडी मोटार, केबल लंपास

कुऱ्हा : शेतातील विहिरीत पानबुडी मोटारीसह केबल लंपास केल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला शिवारात १३ जुलै रोजी उघडकीस आली. प्रमोद श्रीखंडे (रा. आमला) यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुखदेव कोष्टी (रा. आमला) विरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

----------------

मुलाकडून आईला मारहाण

कुऱ्हा : मुलाने आईला मारहाण केल्यबद्दल हटकले असता लहान भावाने मोठ्या भावाला मारहाण केल्याची घटना कारला येथे १३ जुलै रोजी सायंकाळी घडली. महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी आरोपी विलास विठ्ठल चव्हाण (२४, रा. कारला) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------

पैशाच्या वसुलीवरून जिवे मारण्याची धमकी

तळेगाव दशासर : पैशाची वसुली करण्यास गेलेल्या युवकाची कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १३ जुलै रोजी सायंकाळी घडली. मनोज बापूराव वानखेडे यांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी आरोपी सलीम पटेल (३५, रा. देवगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

जुन्या वैमन्यसातून विळ्याने हल्ला

मंगरूळ दस्तगीर : जुन्या वैमनस्यातून उदभवलेला वादात शिवीगाळ व विळ्याने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना १३ जुलै रोजी दुपारी चिंचोली बसस्टँडवर घडली. श्रावण नत्थुजी मडावी यांच्या तक्रारीवरून मंगरुळ पोलिसांनी आरोपी नीलेश अधव (४०, रा. अंबाडा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

बस वाहक महिलेशी प्रवाशांचा वाद

आसेगाव पूर्णा : महिला बस वाहकाशी तिकिटावरून वाद करून शिवीगाळ केल्याची घटना १३ जुलै रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती-परतवाडा बसमध्ये आसेगाव पूर्णानजीक इंदिरा पेट्रोलपंपजवळ घडली. वाहकाच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध आसेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------------------

शाळेत निघालेली मुलगी घरी परतलीच नाही

मंगरुळ चव्हाळा : शाळेत जाण्यासाठी बाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नसल्याची घटना १३ जुलै रोजी उघडकीस आली. नातेवाईकांकडे विचारणा केली. मात्र मिळून आली नसल्याच्या तक्रारीवरून मंगरुळ चव्हाळा पोलिसांनी अज्ञाताविद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Summary Rural News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.