उन्हाचा तडाखा; नागरिक हैराण

By admin | Published: April 11, 2016 12:15 AM2016-04-11T00:15:51+5:302016-04-11T00:15:51+5:30

धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामिण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़

Summer shock; Citizen Hiren | उन्हाचा तडाखा; नागरिक हैराण

उन्हाचा तडाखा; नागरिक हैराण

Next

धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामिण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ विशेषत: कडाक्याच्या उन्हामुळे अनेक आजारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे़
गेल्यावर्षी पावसाने आखडता हात घेतल्यामुळे यावर्षी मार्चपूर्वीच कडक उन्हाळा जाणवू लागला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या तापमानाने उच्चांक गाठला आहे़ दिवसभर शेतात राबणाऱ्या मजुरांना सर्वाधीक उन्हाचे चटके सोसावे लागत आहे़ उन्हामुळे ताप, डोकेदुखी, पोटदुखी यासारखे आजार बडावले असून लहान मुले तसेच वृध्दांनाही आजारांनी हैराण केले आहे़
भर उन्हातून घरी परतल्या नंतर लगेचच पाणी पिण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे़
कडक उन्हाळ्यात शरीराचे योग्य पध्दतीने सरंक्षण करणे आवश्यक आहे़ प्रथम कुठलाही बदल अचानक पणे न करता हळुहळु करणे गरजेचे आहे़ तोच शारीरीक क्षमतेला फायदेशीर ठरू शकतो़ एकदम फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्यापेक्षा सुरवातीला साधे व गार असे मिक्स पाणी प्यावे व एकदम थंड पाण्याने स्रान करण्यापेक्षा हळुहळु बदल करावा असे शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगीतले़
ग्रामीण भागातील मुले दुपारच्या वेळी खुपवेळ नदी, विहीरी मध्ये आंघोळ करतात त्यांनी जास्त वेळ आंघोळ करणे टाळावे दुपारच्या कडक उन्हात जाणे टाळावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे़ एरवी मोठ्या व्यक्तींना दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी लागते तर उन्हाळ्यात किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक ठरते.
उन्हाळ्यात घामावाटे तसेच लघवी वाटे व शौचावाटे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शरीरातील पाणी घटते. त्यामुळे तासाभरानंतर एखादा ग्लास पाणी पिणे उपयुक्त ठरते एसीतून लगेचच कडक उन्हात बाहेर पडणे असा तापमानातील अचानक बदल टाळावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Summer shock; Citizen Hiren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.