हत्येपूर्वी सुनील गजभिये, रहमान, शीतलचे मोबाईल लोकेशन नवसारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:19 PM2018-03-20T22:19:04+5:302018-03-20T22:19:04+5:30

शीतल पाटील हत्याकांडातील दोन्ही आरोपी पसार असून, गाडगेनगर व गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा दाहीदिशा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक अभ्यास सुरू केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सुनील गजभिये, रहमान खां पठाण व शीतल पाटील यांचे लोकेशन नवसारी भागात आढळले.

Sunil Gajbhiye, Rehman, Sheetal's mobile location Navsari before the murders | हत्येपूर्वी सुनील गजभिये, रहमान, शीतलचे मोबाईल लोकेशन नवसारीत

हत्येपूर्वी सुनील गजभिये, रहमान, शीतलचे मोबाईल लोकेशन नवसारीत

googlenewsNext
ठळक मुद्देआक्रमणच्या पदाधिकाऱ्यांसह चार जण ताब्यात

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील दोन्ही आरोपी पसार असून, गाडगेनगर व गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा दाहीदिशा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक अभ्यास सुरू केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सुनील गजभिये, रहमान खां पठाण व शीतल पाटील यांचे लोकेशन नवसारी भागात आढळले. त्यामुळे ते तिघेही मंगळवारी एकत्र होते, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत.
शहरातील इर्विन चौकात १३ मार्च रोजी सायंकाळी शीतल पाटील व सुनील गजभिये एकत्र दिसले. त्यानंतर शीतल पाटील बेपत्ता झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. १६ मार्च रोजी दुपारी शीतल पाटीलचा मृतदेह एक्स्प्रेस हायवेवरील एका विहिरीत आढळला. शीतल पाटील या कालावधीत कोणासोबत होती, तिची हत्या केव्हा झाली, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आक्रमणचे पदाधिकारी ताब्यात
शीतल पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्यानंतर आरोपी सुनील गजभिये, रहमान खां पठाण व त्यांचे सहकारी पसार झाले.
पोलिसांच्या तांत्रिक तपासात मंगळवारी सायंकाळी गजभिये, रहमान खां व शीतल यांच्या मोबाइलचे लोकेशन नवसारी परिसरात आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर त्यांचे मोबाइल बंद झाल्याचे आढळून आले. त्यानंतर रात्री १० वाजता गजभियेचा मोबाइल सुरू झाला आणि त्याचे लोकेशन हे रविनगर परिसरातील घराच्या परिसरातील आढळून आले. बुधवारी गजभिये कॅम्प रोड स्थित डी-मार्टमध्ये शॉपिंग करताना शीतलच्या परिचयातील व्यक्तीला आढळून आला होता. त्या अनुषंगानेही पोलीस चौकशी करीत आहेत. सुनील गजभिये याच्या संपर्कात असणाºयांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. गजभियेच्या आक्रमण संघटनेतील नीलेश मेश्राम याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू आहे. सोबत गाडगेनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये दोन आक्रमण संघटनेचे पदाधिकारी व एक पत्रकार आहे.

शीतल पाटील हत्याकांडातील आरोपींचा कसून शोध सुरू आहे. चार जणांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीची खातरजमा केली जात आहे.
- मनीष ठाकरे
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.

Web Title: Sunil Gajbhiye, Rehman, Sheetal's mobile location Navsari before the murders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.