पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 10:39 PM2018-08-07T22:39:53+5:302018-08-07T22:40:23+5:30

जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. बेसिक पोलिसिंग व सामान्यांना न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Superintendent of Police Dilip Jhalke took the charge | पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार स्वीकारला

पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार स्वीकारला

googlenewsNext

अमरावती : जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. बेसिक पोलिसिंग व सामान्यांना न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मावळते पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांंनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था योग्यरीत्या सांभाळली. त्यांची बदली झाली. त्यांना मंगळवारी निरोप देण्यात आला. त्यांचा पदभार नवीन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सांभाळला. १९९५ मध्ये झळके यांनी पोलीस विभागातील डीवायएसपी पदाची धुरा सांभाळली. परीविक्षाधीन कालावधीत ते अहमदनगर येथे होते.
दिलीप झळके यांची पहिली पोस्टिंग नागपूरच्या कामठी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर झाली. त्यानंतर गडचिरोली, मोर्शी, नागपूर, मुंबई, गोंदिया, भंडारा, वाशिम, परभणी अशी प्रवासानंतर त्यांची बदली अमरावतीत झाली.

Web Title: Superintendent of Police Dilip Jhalke took the charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.