उद्या आकाशात दिसणार ‘सुपरमून’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:13+5:302021-05-25T04:13:13+5:30
अमरावती : यंदा वर्षभरात तीन सुपरमून दिसणार आहेत. त्यापैकी दुसरा सुपरमून २६ मेच्या रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसेल. या दिवशी ...
अमरावती : यंदा वर्षभरात तीन सुपरमून दिसणार आहेत. त्यापैकी दुसरा सुपरमून २६ मेच्या रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसेल. या दिवशी चंद्र साधारणपणे १० टक्के मोठा व ३० टक्के अधिक प्रभावी दिसणार आहे. खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंना हा सुपरमून अवलोकण्याची संधी मिळणार आहे.
पृथ्वी व चंद्रादरम्यानचे अंतर नेहमी ३.८५ लाख किमी एवढे असते. परंतु, २६ मे रोजी हे अंतर ३ लाख ५८ हजार ६१५ किमी एवढे राहणार आहे. त्यामुळे चंद्रबिंब मोठे व प्रकाशमान दिसणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आाल्याने समुद्राच्या भरती- ओहोटीची तिव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. सुपरमून खगोलप्र्रेमी व जिज्ञासूंनी अवश्य अभ्यासावा. तो साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.