अंजनगावात ईईएसएल कंपनीचे एलएडी लाईटचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:18+5:302021-04-28T04:15:18+5:30

********************** ** गेली दोन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली ** कंपनीच्या चुकीमुळे नागरिकांची नगरसेवकाप्रती झाली होती नाराजी ************************************ गेल्या दोन वर्षांपूर्वी ...

Supply of LED lights of EESL Company at Anjangaon | अंजनगावात ईईएसएल कंपनीचे एलएडी लाईटचा पुरवठा

अंजनगावात ईईएसएल कंपनीचे एलएडी लाईटचा पुरवठा

googlenewsNext

**********************

** गेली दोन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली

** कंपनीच्या चुकीमुळे नागरिकांची नगरसेवकाप्रती झाली होती नाराजी

************************************

गेल्या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात शहरातील मुख्य रस्त्यावर पूर्वीचे सीएफएल लाईट काढून त्या जागेवर नवीन एलएडी लाईट लावण्याचे आदेश राज्यातील सर्व नगर परिषदांना देण्यात आले होते. त्यानुसार शासनाच्या आदेशीत कंपनीकडून अंजनगाव शहरात एलएडी लाईट लावण्यात आले होते व त्या लावलेल्या लाईटची मेंटेनन्सची जबाबदारी ही करारनाम्यातील अटीनुसार पाच वर्षांच्या करारावर कंपनीकडून लेखी स्वरूपात ठरली आहे. सुरुवातीला लाईट लावताच शहरात झगमगाट दिसत होता; परंतु शहरात पूर्णपणे लाईट लागल्यानंतर आठ दिवसातच सदरचे लाईट हे दिवसा सुरू तर रात्री बंद अशी स्थिती शहरात निर्माण झाली होती, त्यामुळे सतत नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना सदर बंद लाईटबाबत न. प. सदस्या सुनीता मनोहर मुरकुटे यांनी न. प. च्या प्रशासनाकडे रात्री बंद, दिवसा सुरूबाबत तक्रार केली असता त्यावर नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरात फेरफटका मारून कंपनीकडून त्वरित उपाययोजना म्हणून तक्रारींची त्वरित दखल घेऊन काही अंशी चालू, बंद लाईटच्या समस्या निकाली काढल्या होत्या, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या होत्या. परंतु, गेल्या एक वर्षापासून बंद पडलेले लाईटचे कामच कंपनीकडून केल्या गेले नाही, तसेच शहरातील प्लॉट भागात नवीन पोलवर लाईट उपलब्ध नसल्यामुळे न. प. कडून वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला; परंतु काही एक उपयोग झाला नाही, त्यामुळे कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या एक महिन्यापूर्वीच नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल एक लाख रुपये वसुलीचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला व तसा पत्रव्यवहारसुद्धा कंपनीकडे करण्यात आला असता ईईएसएल कंपनीकडून शहरातील बंद पडलेले लाईट बदलवण्यात आले नाही त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये नगरसेवकांप्रती कंपनीची चूक असताना नाराजीचा सूर दिसून येत होता.

एकीकडे शासनाचे ध्येयधोरणानुसार नगर परिषदेकडे नवीन लाईट विकत घेण्याची कोणतीही परवानगी नाही त्यामुळे न. प. ला विद्युत लाईट खरेदीसाठी कोणतीही शासनाकडून निधीची तरतूदसुद्धा नसल्यामुळे नगर परिषदेला लाईट विकत घेता येत नाहीत, त्यामुळे न. प. ची इकडे आड, तिकडे विहीर परिस्थिती झाली होती. अखेर गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरातील प्लॉट भागातील पोलवर लाईट लावण्यासाठी कंपनीकडून लाईट पुरवण्यात आले असून सद्यस्थितीत प्रत्येक प्रभागमध्ये ईईएसएल कंपनीकडून लाईट लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. यासाठी प्रत्येक प्रभागातील नगरसेवक हे योग्य त्या ठिकाणी लाईट लावून घेत आहेत.

Web Title: Supply of LED lights of EESL Company at Anjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.