बायोमेट्रिक रेशनसाठी ३८ लाख ग्राहकांचे आधार लिंक, राज्यातील वितरण व्यवस्थेची स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 04:18 PM2017-11-30T16:18:59+5:302017-11-30T16:41:39+5:30

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये व्यवहार पारदर्शी होऊन भ्रष्टाचार निकाली निघावा, यासाठी राज्यातील ५१ हजार ८९६ रेशन दुकानात ‘पीओएस’ (पॉस) मशीन बसविण्यात आल्यात. या प्रक्रियेसाठी ३८ लाख ६८ हजार ६८३ कुटुंब सदस्य आधार लिंक करण्यात आले. याद्वारे सद्यस्थितीत ६६ टक्के रेशन धान्याचा पुरवठा बायोमेट्रिकद्वारे होत आहे.

The support link for 38 million customers for biometric ration, state distribution system status | बायोमेट्रिक रेशनसाठी ३८ लाख ग्राहकांचे आधार लिंक, राज्यातील वितरण व्यवस्थेची स्थिती 

बायोमेट्रिक रेशनसाठी ३८ लाख ग्राहकांचे आधार लिंक, राज्यातील वितरण व्यवस्थेची स्थिती 

Next

- गजानन मोहोड

अमरावती : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये व्यवहार पारदर्शी होऊन भ्रष्टाचार निकाली निघावा, यासाठी राज्यातील ५१ हजार ८९६ रेशन दुकानात ‘पीओएस’ (पॉस) मशीन बसविण्यात आल्यात. या प्रक्रियेसाठी ३८ लाख ६८ हजार ६८३ कुटुंब सदस्य आधार लिंक करण्यात आले. याद्वारे सद्यस्थितीत ६६ टक्के रेशन धान्याचा पुरवठा बायोमेट्रिकद्वारे होत आहे.
अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन ख-या लाभार्थीना रेशन धान्याचा पुरवठा व्हावा व सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सर्व व्यवहार पारदर्शी व्हावेत अन् भ्रष्टाचाराला चाप बसावा, यासाठी पुरवठा विभागाद्वारा रेशन दुकानात पॉस (पाँइंट आॅफ सेल) मशीन बसविण्यात येत आहेत. सर्व रेशन दुकाने, घाऊक व किरकोळ रेशन परवानाधारक, पुरवठा विभागाची गोदामे गॅस एजन्सीचा डेटा संलग्न करून संगणकीकृत करण्यात आलेला आहे. राज्यात ५२ हजार २२९ पॉस मशीन लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातुलनेत सध्या ५१ हजार ८९६ मशीन बसविण्यात आल्यात. राज्यात १ कोटी ३ लाख ७२ हजार १७६ एकूण ग्राहकसंख्या आहे. त्यातुलनेत सध्या ३८ लाख ६८ हजार ६८८ सदस्यांचे आधार कार्ड लिंक करण्यात आले आहेत.
राज्यात नोव्हेंबर महिन्यासाठी २ लाख ४२ हजार ८५५ मेट्रीक टन धान्याचे आवंटन मंजूर करण्यात आले, यापैकी ६४ टक्के धान्यवाटप हे पॉस मशीनद्वारा करण्यात आले. त्याच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात ६६ टक्के धान्यवाटप करण्यात आले होते. पुरवठा विभागाद्वारा शिधापत्रिकांचे आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि बँक खाते क्रमांकाची माहिती यापूर्वी संकलित करण्यात आलेली आहे. याद्वारे रेशन दुकानातील स्टॉक, लाभार्थ्यांनी केलेली धान्याची उचल याविषयीची माहिती पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर आता उपलब्ध केली जाणार आहे.

आणखी वाचा - आता इंटरनेट कनेक्शनसाठीदेखील आधार कार्ड आवश्यक

जिल्हानिहाय लावलेल्या पॉस मशीन
राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात १५२३, कोल्हापूर १५७०, गोंदिया ९९७, वाशिम ७७४, नांदेड १९७७, वर्धा ८४०, सांगली १३४२, भंंडारा ८८४, जालना १२८०, अकोला १०४०, परेल ५६९, परभणी ११८३, उस्मानाबाद १०७९, गडचिरोली ११९५, वडाळा, १०३३, अंधेरी ५३२,औरंगाबाद १७९७, कांदीवली ७०१, नागपूर १९४१, हिंगोली ७९५, सातारा १६२६, बुलडाणा १५३९, ठाणे १,४१९, अमरावती १९२२, नाशिक २५९६, सोलापूर १८६९, धुळे ९८५, जळगाव १९२६, पुणे २६३०, बीड १९६२, ठाणे ५९०, नंदूरबार ९९०, रत्नागिरी ९१५, सिंधुदुर्ग ४३२, रायगड १३५७, अहमदनगर १८९३ व पालघर जिल्ह्यात १०९५ मशीन लावण्यात आल्यात.

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

Web Title: The support link for 38 million customers for biometric ration, state distribution system status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.