‘सूर रायझिंग स्टार’मधून चमकले उद्याचे ‘सुपरस्टार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:40 PM2018-01-24T22:40:39+5:302018-01-24T22:41:34+5:30

आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही.

'Sur Rising Star' shines in tomorrow's superstar | ‘सूर रायझिंग स्टार’मधून चमकले उद्याचे ‘सुपरस्टार’

‘सूर रायझिंग स्टार’मधून चमकले उद्याचे ‘सुपरस्टार’

Next
ठळक मुद्देकलर्स व लोकमत समूहाचा संयुक्त उपक्रम : बहारदार सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध; कार्यक्रमाला

उत्स्फूर्त प्रतिसाद
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्या कलाकौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी लोकमत समूह नेहमीच आघाडीवर असतो. विविध कार्यक्रम, स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या ‘उद्या’च्या सुपरस्टार्संना प्रकाशझोतात आणले जाते. सुरांची देणं लाभलेल्या प्रतिभावान गायकांना एक नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी 'लोकमत' आणि कलर्स वाहिनी आगळा-वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. ‘सूर रायझिंग स्टार’र् ेचे असे त्याचे नाव. कलर्स व लोकमतद्वारे आयोजित ही गायन स्पर्धा अभियंता भवन, शेगाव नाका चौक, अमरावती येथे पार पडली.
यामध्ये ४ वर्षा पुढील मुले-मुली, स्त्री-पुरुष आदींचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी टिप्स म्युझिकल कंपनीचे सिंगर व म्युझिक डायरेक्टर मुमताज रफी व म्युझिक टिचर संगीता गावंडे उपस्थित होते. कार्यक्रमात अनेक स्पर्धकांनी विविध प्रकारची गाणी सादर केली. प्राथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धकांनी आपल्या गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये ‘मेरे ढोलना’,‘आओ ना गले लगाओना’, ‘सुन हर है तु’, ‘गारवा’, ‘रिमझिम गिरे सावन’.
विशेष म्हणजे या प्रयत्नांना यंदा साथ मिळाली आहे, ती कलर्स वाहिनीची. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये कलर्सने बोलबाला निर्माण केला आहे. शुद्ध कौटुंबिक संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासोबत सामाजिक बांधीलकीचेही अनेक उपक्रम राबविले जातात.
उपस्थितांमधून लडी ड्रॉ काढण्यात आला त्यात दीपक घाटोळ व अफरीन खान विजेते ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष शिंगोरे यांनी केले. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘सूर रायझिंग स्टारचे’ या निमित्ताने कलर्स वाहिनी घेऊन येत आहे. भारतातील पहिल्या लाईव्ह रिअ‍ॅलिटी शोचे दुसरे पर्व, ज्याद्वारे मोडल्या जाणार विचारांच्या चौकटी, भाषा, जात, आर्थिक स्थिती, धर्म अशा विविध चौकटींची आज काहीही गरज नाही. अशा चौकटींचे बंधने झुगारून आपले टॅलेंट जगासमोर आणणाºया गायकांना या चौकटी मोडण्यास मदत म्हणून या शोच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपºयातून लाईव्ह व्होटिंग करू शकता. यामध्ये साथीला आहेत देशातील तीन सुप्रसिद्ध महारथी परीक्षक गायक व संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर आणि अभिनेता व गायक दिलजित दोसांज. परंतु खरे परीक्षक तर कलर्स वाहिनी पाहणारे देशातील १३० कोटी भारतीयच असणार आहेत. मग या सिझनमध्ये केवळ विचारांच्या चौकटीच नाही मोडल्या जाणार, तर देशातील प्रतिभावान गायकांचे नशीबही पालटणार आहे. कलर्स वाहिनीवर २० जानेवारीपासून दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता सूर झाली आहे. देशातील एकमेव लाईव्ह सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘सूर रायझिंग स्टार’.

Web Title: 'Sur Rising Star' shines in tomorrow's superstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.