ऑपरेशन थिएटरचे कुलूप तोडून केली शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:27+5:302021-03-06T04:13:27+5:30
अनिल कडू परतवाडा : गर्भवती मातेसह तिच्या पोटातील बाळाचे प्राण वाचविण्याकरिता चक्क डॉक्टरांना आॅपरेशन थिएटरचे कुलूप तोडावे लागले. वेळेवर ...
अनिल कडू
परतवाडा : गर्भवती मातेसह तिच्या पोटातील बाळाचे प्राण वाचविण्याकरिता चक्क डॉक्टरांना आॅपरेशन थिएटरचे कुलूप तोडावे लागले. वेळेवर निर्णय घेत कुलूप तोडून केल्या गेलेल्या शस्त्रक्रियेने डॉक्टरांना त्या मातेसह तिच्या बाळाचे प्राण वाचविण्यात यश आले.
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी रात्री ११ वाजताचे सुमारास ही घटना घडली. एक गर्भवती महिला प्रसूतीकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. दरम्यान तिला वेदना असह्य होवू लागल्यात. लागलीच आॅन कॉल प्रसुती स्त्रीरोग तज्ज्ञ व बधिकरण तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावल्या गेले. स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्रीकांत धुमाळे व भूलतज्ञ डॉ. कानुनगो यांनी त्या दृष्टीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. महिलेची बिघडत असलेली प्रकृती बघता तिला आॅपरेशन थिएटरमध्ये नेण्यास सुचविले गेले. दरम्यान त्या आॅपरेशन थिएटरला कुलूप लागले होते. ज्या संबंधित कर्मचाºयांकडे त्या थिएटरची चावी होती, त्याचा मोबाईल लागत नव्हता. ती चावी उपलब्ध होवू शकली नाही. इकडे त्या महिलेची प्रकृती खालावत असतांनाच घडलेला प्रकार वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांच्या कानी घातल्या गेला. डॉ. ढोले यांनी तात्काळ ते कुलूप तोडून शस्त्रक्रिया करण्यास सुचवले. संबंधित डॉक्टर्स व उपजिल्हा रुग्णालयातील तेवढ्याच रात्री शस्त्रक्रियेची तयार करुन ती शस्त्रक्रिया यशस्वी केली. यात ती माता व तीचे बाळ आज सुखरुप आहे. दोघांचीही प्रकृती केली.
--------------