नुकसानग्रस्त भागाची बच्चू कडूंकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:15+5:302021-07-20T04:11:15+5:30
सर्वेक्षण करून पंचनामा तात्काळ सादर करण्याचे निर्देश फोटो पी १९ बच्चू कडू चांदूर बाजार : तालुक्यातील आसेगाव महसूल मंडळातील ...
सर्वेक्षण करून पंचनामा तात्काळ सादर करण्याचे निर्देश
फोटो पी १९ बच्चू कडू
चांदूर बाजार : तालुक्यातील आसेगाव महसूल मंडळातील गावांमध्ये १८ जुलै रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे अनेक खेड्यांना याचा फटका बसला. या नुकसानग्रस्त भागाचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी १९ जुलै रोजी पाहणी केली. सर्वेक्षण करून तात्काळ पंचनामा सादर करण्याचे निर्देश दिले तसेच पंचनामा सादर करण्यात वेळ झाला, तर कारवाईदेखील करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांना दिले.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हिरूळपूर्णा, सर्फाबाद या गावांमध्ये पावसाचा पाण्यामुळे झालेल्या नुकसानाच्या ठिकाणी भेट दिली. गावकऱ्यांनी त्यांना नुकसानाची माहिती त्यांना दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य संतोष किटुकलेदेखील उपस्थित होते. या पावसामुळे संजय थकिते, शिवलाल ठाकुरकर, चंद्रशेखर बुसकडे तसेच रसुलापूर येथील सतीश भेटाळू, अमोल भेटाळू या शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण होणार असल्याचे प्रभारी तहसीलदार अक्षय मांडवे यांनी सांगितले.
चांदूर बाजार महसूल मंडळात सर्वाधिक ६६.३ मिमी पाऊस झाला. यामध्ये तळवेळ, बऱ्हाणपूर येथील पाच घरांच्या भिंती आणि अंशदान नुकसान झाले आहे, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख पंकज चव्हाण यांनी दिली. रविवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील हिरूळपूर्णा या ठिकाणी संपूर्ण शेती आणि नाल्याचे पाणी गावात शिरले. ते पाणी गावाच्या बाहेरून काढण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा प्रस्तवा तयार करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, प्रभारी तहसीलदार अक्षय मांडवे, पंचायत समिती सदस्य संतोष किटुकले, स्वीय सहायक दीपक भोगाडे उपस्थित होते.
---------------नुकसान ग्रस्त भागाच्या प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व मंडळ अधिकरी आणि तलाठी यांना दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी त्याबाबतची माहिती किंवा अर्ज तलाठ्याकडे सादर करावा. म्हणजे सर्वेक्षणामधून नुकसान झालेले खरे शेतकरी सुटणार नाही. - राज्यमंत्री बच्चू कडू
----------------------
नुकसान झालेल्या सर्व भागांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. मंडळ अधिकारी आणि तलाठी सर्वेक्षण करीत आहेत. एक ते दोन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. - अक्षय मांडवे, प्रभारी तहसीलदार, चांदूर बाजार
190721\img-20210719-wa0097.jpg
पाहणी करताना राज्यमंत्री बचू कडू