चार हजार प्रगणकांद्वारे ३.३२ लाख घरांचे सर्वेक्षण; मराठा समाजाचे मागासलेपणाचे सर्वेक्षण
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 29, 2024 09:18 PM2024-01-29T21:18:32+5:302024-01-29T21:18:57+5:30
अडथड्यांची शर्यत, गावांचा नंबरच दिसेना
अमरावती : मराठा समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासणीच्या सर्वेक्षणातील अडथड्यांची शर्यत अद्याप संपलेली नाही. त्यातच सलग तीन दिवस सुट्या आल्याने सर्वेक्षण मंदावले. अशाही परिस्थितीत शहर व ग्रामीणमधील चार हजार प्रगणकांद्वारा आतापर्यंत ३.९४ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे सांगितले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अचूक माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून गोळा केली जात आहे. जिल्हा ग्रामीणमधील ३,१४३ व महापालिका क्षेत्रातील ८३६ अशा एकूण ३,९७९ वर प्रगणक व पर्यवेक्षकांच्या माध्यमातून मराठा व खुला प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. या ॲपमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. ॲप हँग होत आहे. सुरू झाल्यास यामध्ये अनेक गावांचे क्रमांकच दिसत नसल्याची मोठी तक्रार समोर आलेली आहे. शिवाय खुल्या प्रवर्गातील काही जातींच्या नोंदी ॲपमध्ये दिसत नसल्याचेही समोर आले आहे. याबाबत कळविण्यात आल्यानंतर त्रुटी दूर करण्यात आल्या. महापालिकेच्या प्रभागांमध्येही प्रगणकांना अनेक ठिकाणी अडचणी आलेल्या आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे विहित मुदतीत काम पूर्ण होणे सध्या तरी अशक्य दिसत आहे.