पाणीटंचाई निवारणार्थ जलस्रोतांचे सर्वेक्षण

By admin | Published: February 29, 2016 12:01 AM2016-02-29T00:01:59+5:302016-02-29T00:01:59+5:30

बडनेरा मतदार संघातील तसेच अमरावती तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणी टंचाईचे सावट आहे.

Survey of water resources for water shortage prevention | पाणीटंचाई निवारणार्थ जलस्रोतांचे सर्वेक्षण

पाणीटंचाई निवारणार्थ जलस्रोतांचे सर्वेक्षण

Next

रवी राणा यांचा पुढाकार : तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
अमरावती : बडनेरा मतदार संघातील तसेच अमरावती तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणी टंचाईचे सावट आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात ही स्थिती अधिकच भयंकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आ. रवी राणा यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह या भागाचा शनिवारी दौरा करून जलस्त्रोतांचे सर्वेक्षण केले.
बडनेरा मतदारसंघातील अमरावती तालुक्यातील पिंपळखुटा, बोंडणा, पोहरा, इंदला, मासोद, भानखेडा, कस्तुरा, मोगरा, हातला, गोविंदपूर, अमळापूर, कोंडेश्वर, अंजनगाव बारी, उदखेड, अऱ्हाड-कुऱ्हाड, पार्डी, वडगाव जिरे, वडगाव माहोरे, बोरगाव धर्माळे, राजुरा, वडद, परसोडा या गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट गडद होत आहे. पुढे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी आ. रवि राणा यांनी उपविभागीय अधिकारी ठाकरे, तहसीलदार, बगडे, उपविभागीय कृषी अधिकारी खर्चान, बीडीओ कापडे, एसडीई झाडे, ढेरे, तालुका कृषी अधिकारी लाड, वन परीक्षक अधिकारी पडगव्हाणकर, वन वर्तुळ अधिकारी कोहळे आदींचा सहभाग होता.
यावेळी परिसरातील जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली. कोरड्या विहिरी, कोरडे तलाव कायमस्वरूपी जलयुक्त कसे करता येतील, यावर मंथन करण्यात आले. बोअर, नाला खोलीकरण, सरळीकरण आदींबाबतही यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी आ. राणा यांच्यासह यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, पोहरा येथील सरपंच वनिता राऊत, उपसरपंच संजय शिंदे, सरपंच जयश्री भोयर, सरपंच भोसले आदींची उपस्थिती होती.

Web Title: Survey of water resources for water shortage prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.