पक्षिमित्रांनी वाचविले १५ जंगली कबुतरांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:07 PM2019-07-04T23:07:15+5:302019-07-04T23:07:50+5:30

तालुक्यातील उत्तमसरा गावात शिकाऱ्याकडून १५ जंगली कबुतरांना पक्षिमित्रांनी सोडविले. तपासणीनंतर ते वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

Survivors save 15 lives of wild doves | पक्षिमित्रांनी वाचविले १५ जंगली कबुतरांचे प्राण

पक्षिमित्रांनी वाचविले १५ जंगली कबुतरांचे प्राण

Next
ठळक मुद्देअंधश्रद्धेचे ठरतात बळी : वनविभाग आणि वसा संस्थेची संयुक्त कार्यवाही, उत्तमसरा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भातकुली : तालुक्यातील उत्तमसरा गावात शिकाऱ्याकडून १५ जंगली कबुतरांना पक्षिमित्रांनी सोडविले. तपासणीनंतर ते वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
उत्तमसरा गावात मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास चार शिकारी शिरले. गावानजीक असलेल्या शेतात त्यांनी शिकारी जाळे लावले. जाळ्यावर टाकलेल्या धान्याकडे कबुतरे आकर्षित होऊन त्यात अडकली. सकाळपासून पाळतीवर असलेल्या ग्रामस्थांनी वसा संस्थेला या घटनेची माहिती दिली. संस्थेचे सहायक पशुचिकित्सक शुभम सायंके, पक्षिमित्र भूषण सायंके, निखिल फुटाणे, मुकेश मालवे, पंकज मालवे आणि गणेश अकर्ते यांनी शेतात जाऊन पडताळणी केली असता, त्यांना चार शिकारी आढळले व जखमी अवस्थेत १५ कबुतरेही मिळाली. वसाच्या माहितीवरून उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुम्बर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकार प्रतिबंध पथकाचे वनरक्षक अमोल गावणेर, उमक आणि ठाकूर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु, शिकारी पसार झाले होते. जखमी कबुतरांवर शुभम सायंके यांनी प्रथमपोचार केलेत. तपासणीनंतर सर्व कबुतरे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकारावर वनविभागाने अंकुश ठेवण्याची मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.
लकव्याच्या उपचारासाठी शिकार
लकवा गेलेल्या रुग्णाला जंगली कबुतराचे रक्त लावल्यास तो बरा होतो, या गैरसमजातून दररोज अनेक जंगली कबुतरांची शिकार केली जाते. अशी शिकारीची घटना आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती वसाचे शुभम सायंके यांनी दिली.
शिकारीची क्रूर पद्धत
शिकारी त्यांची पाळीव कबुतरे जाळ्यात बांधून ठेवतात. त्यांना उपाशी ठेवून अवतीभोवती धान्य टाकतात. बाजूला धान्य असूनही ते खाता येत नसल्याने ती कबुतरे जिवाच्या आकांताने ओरडतात. त्यांचे ओरडणे ऐकून परिसरातील इतर कबुतरे जाळ्यानजीक येऊन अडकतात. लपून बसलेला शिकारी हातामधली दोरी ओढतो. पक्षी जाळ्यात अडकल्यानंतर त्यांचे एका बाजूचे पंख हाताने उपटून मोडून टाकतात. त्यामुळे हे पक्षी उडू शकत नाही, असे निखिल फुटाणे यांनी सांगितले.

Web Title: Survivors save 15 lives of wild doves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.