सर्पमित्रांनी वाचविले अजगराच्या पाच पिलांचे प्राण

By admin | Published: July 10, 2017 12:01 AM2017-07-10T00:01:46+5:302017-07-10T00:01:46+5:30

गोबर गॅसच्या बंद टाक्यात आढळलेल्या अजगराच्या १३ पिलांपैकी पाच पिलांचे प्राण वाचविण्यात कार्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यश मिळाले.

The survivors saved the life of the five piglets | सर्पमित्रांनी वाचविले अजगराच्या पाच पिलांचे प्राण

सर्पमित्रांनी वाचविले अजगराच्या पाच पिलांचे प्राण

Next

वैभव बाबरेकर। लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गोबर गॅसच्या बंद टाक्यात आढळलेल्या अजगराच्या १३ पिलांपैकी पाच पिलांचे प्राण वाचविण्यात कार्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यश मिळाले. अजगर नजरेस पडताच भयग्रस्त नागरिकांनी सात पिलांना मारून टाकले. मात्र, त्याच दरम्यान सर्पमित्र पोहोचल्यामुळे पाच अजगरांच्या पिलांचे प्राण वाचू शकले. हाप्रकार भातकुली तालुक्यातील ऋणमोचननजीक नांदेड खुर्द गावात घडली.
यागावातील रहिवासी मयूर कडू यांच्या घराच्या आवारात गोबर गॅसचे बंद टाके आहे. शनिवारी त्या टाक्यातून अजगराची पिले बाहेर येताना दिसून आली होती. अजगराची पिले आढळल्याची माहिती गावात पसरताच बघ्यांची गर्दी उसळली होती. काही नागरिकांनी भीतीपोटी अजगरांच्या पिलांना मारण्यास सुरूवात केली. ह ाप्रकार गावातील सर्पमित्रांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना अजगराच्या पिल्लांना ईजा न करण्याची विनवणी केली. काही युवकांनी लगेच याबाबत उत्तमसरा येथील सर्पमित्र सचिन सवाई याला फोनवर माहिती दिली. सचिन सवाई यांनी तत्काळ नांदेड खुर्द गाठले. मात्र, तोपर्यंत भयग्रस्त नागरिकांनी अजगराच्या सात पिल्लांची यमसदनी रवानगी केली होती.
मात्र, गोबर गॅसच्या टाकीत आणखी काही पिल्ले असल्याचे सचिनच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गोबर गॅसचे टाके खोदून काढले असता अंड्यांमधून आणखी काही अजगराची पिल्ले बाहेर येत असल्याचे दिसून आले. पाच पिल्लांना वाचविण्यात सर्पमित्र सचिन सवाई याला यश आले. सात पिल्ले मेल्यानंतर आणखी पाच पिल्लांना वाचविण्यात अजगराच्या अंड्यापैकी एक अंडे खराब झाले होते. बचावलेली अजगराची पाच पिल्ले सर्पमित्र सचिन सवाई यांनी कार्सचे चेतन भारती यांच्याकडे आणून दिली.

दाभा गावात आढळला ‘हरणटोळ’
भारतातील सर्वांत सुंदर सापांच्या यादीत असलेला हरणटोळ जातीचा साप नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावांत आढळून आला. ‘वसा’च्या सर्पमित्रांनी यासापाचे प्राण वाचवून त्याला त्याच्या अधिवासात सोडले. निमविषारी असणाऱ्या हरणटोळला अंधश्रद्धेमुळे विनाकारण ठार केले जात आहे. सर्पमित्र गोपाल बारस्कर, सागर श्रुंगारे, शैलेश आखरे यांनी सापाची नोंद घेतली आहे.

जखमी नागाला जीवदान
कठोरा परिसरातील एक घर पाडताना भिंतीमध्ये आढळलेला नाग सब्बलीने गंभीर जखम झाली. साप पाहून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यांनी तत्काळ कार्स संस्थेचे चेतन भारती यांना फोनद्वारे माहिती कळविली. भारती यांनी सर्पमित्र शुभम् गिरीला घटनास्थळी पाठवून नागाला ताब्यात घेतले. शुभमने नागाला थेट वन्यजीव अभ्यासक राघवेंद्र नांदे यांच्याकडे नेले. त्यांनी पशू चिकित्सक सूरज रुईकर यांना बोलावून नागावर उपचार सुरु केले. नागाच्या जखमेवर तीन टाके देऊन त्यांनी उपचार केला. काही दिवस नागाला निरीक्षणात ठेवल्यानंतर त्या सापाला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. यावेळी रोशन अबु्रक, सनी सिराज व सैयद सिराजुद्दीन सैयद नाजीर उपस्थित होते. सर्पांना जीवदान देण्यासंदर्भात नागरिकांनीही जागरूकता बाळगण्याची गरज आहे.

Web Title: The survivors saved the life of the five piglets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.