वडद जंगलातील संशयीत मृतदेह सचिन वारकड यांचाच; बहिणीने पटविली ओळख        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 07:09 PM2020-01-05T19:09:31+5:302020-01-05T19:09:35+5:30

सचिनचा घातपात करण्यात आल्याची तक्रार त्याचे वडील माधव नागोबा वारकड यांनी महागाव पोलिसांकडे केली होती.

Suspected dead body of Sachin Warkad in Wadad forest; Identification given by sister | वडद जंगलातील संशयीत मृतदेह सचिन वारकड यांचाच; बहिणीने पटविली ओळख        

वडद जंगलातील संशयीत मृतदेह सचिन वारकड यांचाच; बहिणीने पटविली ओळख        

Next

यवतमाळ: वडद येथील जंगलात काल कुजलेल्या अवस्थेत अढळून आलेला मृतदेह बेपत्ता असलेल्या टेंभी येथील सचिन माधव वारकड ( २६ )  याचाच असल्याचा दावा सचिनची बहीण  रूपाली माधव वारकड हीने केला आहे. रूपालीने केलेला दावा खरा असेल तर हा मृतदेह नेमका सचिन वारकड याचाच आहे काय याची खातरजमा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. 

तालुक्यातील टेंभी येथील सचिन वारकड हा तरूण १५ ऑगस्ट पासून बेपत्ता आहे. सचिनचा घातपात करण्यात आल्याची तक्रार त्याचे वडील माधव नागोबा वारकड यांनी महागाव पोलिसांकडे केली होती. सचिनचा अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून काटा काढण्यात आल्याचा संशय त्यांनी  तक्रारीतून व्यक्त केला होता व  संशयीतांची नावेही तक्रारीत नमूद केली होती मात्र या गंभीर तक्रारीला बेदखल करण्यात आल्यामुळे महागाव पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केल्या जात होता. 

या घटनेची पृष्ठभुमी अशी की, माधव वारकड यांचा मुलगा सचिन हा १५ ऑगस्ट  २०१९ पासून घरून बेपत्ता झाला हाेता. शेतामध्ये जागली साठी जातो असे सांगून तो रात्री घरून निघून गेला, तेव्हापासून त्याचा कुठलाही मागमूस लागला नव्हता. त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर माधव वारकड यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार महागाव पोलिसांकडे दाखल केली. पोलिसांनीही मिसिंग ची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर आई-वडील व नातेवाइकांनी बेपत्ता असलेल्या सचिन वारकड याचा अनेक ठिकाणी शोध घेतला. परंतु त्यांना सचिन बाबत वेगळीच माहिती मिळाली. सचिन वारकड याचे गावातीलच एका महिलेसोबत बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याचे गुढ उघड झाले, विशेष म्हणजे सचिन आणि संबंधित महिला काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे सोबत पळून गेल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यावेळी सर्व नातेवाईकांनी सचिन वारकड यांची समजूत घालून त्यास घरी परत आणले होते. परंतू गावी परत आल्यानंतरही या दोघांमधील संपर्क कायम होता. संबंधित महिला विवाहित असून सचिन वारकड याच्यापेक्षा ती बरीच वयस्क असल्याचे कळते. त्या दोघांमधील अनैतिक संबंधातून सचिन वारकड यास एक तर लपवून ठेवले किंवा त्याचा संगनमताने घातपात करण्यात  आला अशी तक्रार सचिनचे वडील माधव वारकरड यांनी महागाव पो. स्टे. ला  दिली होती, परतू पोलीसांनी ही तक्रार बेदखल केली होती. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर संशयित आरोपी विरोधात सचिनच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र काल वडद येथील जंगलात एक अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतकाची अंगकाठी आणि पॅन्ट यावरून हा मृतदेह सचिन वारकड याचाच असल्याचा दावा सचिनची बहिण रूपाली हीने केला असून मृतदेहाची डीएनए चाचणी करून मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मूर्तकाची ओळख पटविण्यासाठी आम्ही त्याचा डी एन ए चाचणी करू ,ओळख पटल्यास त्या नंतर हा मूर्तदेह त्यांच्या स्वाधीन करू असं ठाणेदार दामोदर काशीराम राठोड यांनी सांगितले.

Web Title: Suspected dead body of Sachin Warkad in Wadad forest; Identification given by sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.