अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय ?

By Admin | Published: September 29, 2016 12:13 AM2016-09-29T00:13:18+5:302016-09-29T00:14:27+5:30

अंजनगांव तालुक्यातील रहिमापूर चिंचोली येथील युवक अमर सुखदेव साबळे याची सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली.

Suspected suspicions of murder? | अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय ?

अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय ?

googlenewsNext

मोबाईल गायब : अमर साबळेच्या हत्येचा ४८ तासानंतरही सुगावा नाही 
संदीप मानकर अमरावती
अंजनगांव तालुक्यातील रहिमापूर चिंचोली येथील युवक अमर सुखदेव साबळे याची सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. दर्यापूर-अंजनगाव मार्गावर लेहगावनजीक ही घटना सोमवारी घडली होती. पण, ती मंगळवारी उघडकीस आली. ही घटना अनैतिक संबधातून तर घडली नाही ना? या दिशेने पोलीस तपास करीत असून ४८ तासनंतरही या घटनेचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
याप्रकरणी बुधवारी अमरच्या कुंटंूबियांचे बयाण दर्यापूर पोलिसांनी नोंदविले. मंगळवारी अमरावती येथील फॉरेन्सीक लॅबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात अमरचे श्वविच्छेदन करण्यात आले. हत्येमागचे कारण अतिशय गुंतागुंतीचे आहे. हत्या कोणत्या कारणाने झाली, त्यादिशेने पोलिसांनी तपासाची दिशा फिरविली आहे. घटनास्थळावर पोलिसांना हत्या अधोरेखित करणारे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तो वापरत असलेला मोबाईलही घटनास्थळावरून गायब असून तो बंद आढळून आला आहे. दर्यापूर पोलिसांनी लोकमतला दिलेल्या महितीनुसार अमरचे वडील सुखदेव साबळे यांचे दोन विवाह झाले आहेत. दोन्ही पत्नींपासून त्यांना अपत्ये आहेत. दर्यापूर येथील पत्नी पवन या मुलासोबत मृत अमरच्या वडिलांपासून विभक्त राहाते. मृत अमर आणि त्याचा सावत्र भाऊ पवन यांच्यामध्ये सोमवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान वादावादी झाली होती, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. अमरने पवनसोबत वाद घालून त्याची दुचाकी मागितली होती. ही दुचाकी घेऊन तो चिंचोलीच्या दिशेने निघाला होता. पोलिसांनी यासंदर्भात तपास केला असता ही दुचाकी पवनच्या नावे नसून त्याने काही वर्षांपूर्वी ती अकोल्यातील एक गृहस्थाकडून खरेदी केली होती. दुचाकीची कागदपत्रे त्याच्या नावे नाहीत. त्यामुळे त्या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. अमरला सख्खा लहान भाऊ आहे. त्याचे पोलिसांनी बयाण घेतले असता वर्षभरापूर्वी अमरचे अंजनगांव येथील युवतीशी आर्य समाजमंदिरात लग्न झाले होते. परंतु वाद झाल्याने तिने अमरला सोडून दुसरा विवाह केला होता. आता अमर आई- वडील व लहान भाऊ व त्याची दुसरी पत्नीसोबत रहिमापूर चिंचोली येथे राहत होता. तो मैत्र्य कंपनीत एजंट असल्याचे समजते. त्याला दारुचे व्यसन जळले होते. त्यामुळे हत्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी त्याच्या वडीलांनी ही चिंचोली पोलिस स्टेशनला अमरविरुध्द तक्रार नोदविली होती. त्याचे वडील सुखदेव साबळे हे येथीलच एका शाळेत शिपाई पदावर कार्यरत आहे. मी शासकीय नोकरी करतो मला पगारही चांगला आहे. मुलांना हा पगार देतो. तरीही दोन्ही मुले मला चांगला पाहत नाहीत,असे त्या तक्रीरीत नमुद असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे अमराच्या हत्येमागचे नेमके कारण काय? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. कोटुंबिक वाद की, पहिल्या बायकोच्या वादाचे कारण , की प्रवासा दरम्यान लुटमारी किंवा ईतर ठिकाणी तिसऱ्याच युवतीशी अनैतिक सबंध असा चौफेर दिशेने तपास दर्यापूर पोलिस करीत आहे. त्याच्या मृत्यूपूर्वी सावत्र भाऊ पवनशी शेवटचे बोलने त्याच्या भ्रमनध्वनीवरुन सोमवारी रात्री ९.३० वाजता झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. पण मोबाईल घटनास्थळावरुन गायब असल्यामुळे पोलिस मोबाईलचा शोध घेत आहे.

फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत पीएम
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा त्याची धारदार अवजाराने गळा चिरून हत्या करण्यात आली. त्याच्या डोळयाच्या खाली कुऱ्हाडीच्या दांड्याने जोरदार वार केल्यामुळे नाकावर मोठा घाव असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अमरावती फॉरेन्सीक लॅबचे तज्ज्ञ व फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण केल्यानंतरच पंचनामा करण्यात आला. फॉरेन्सीक लॅबच्या वरिष्ठ तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या उपस्थिीत श्वविच्छेदन केले.

पोलिसांचे पथक रवाना
दर्यापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन गवारे प्रकरणाचा तपास करीत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अनुभवी पोलीस या पथकात समाविष्ट करण्यात आले असून ते चिंचोली, अंजनगांव व अकोला येथे जावून या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

कुटूंबाचा पूर्व इतिहास खुप गुंतागुंतेचा आहे. घटनास्थळी काहीही पूरावे सापडले नाही. त्यामुळे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. परिवाराचे बयाण घेण्यात आले आहे.
- सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर

Web Title: Suspected suspicions of murder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.