संशयितांकडे मिळाला चोरीतील ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:00 AM2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:08+5:30
सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव व त्यांचे सहकारी रविवारी पहाटे नवीन बसस्टँड भागात गस्त घालून वाहनांची तपासणी करीत होते. तपासणी करीत असताना दुचाकीवर असलेल्या दोन इसमांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी तेथून धूम ठोकली. संशय आल्याने पोलिसांनी चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला. परतवाडा रोडवरील पेट्रोल पंपासमोर त्यांना पकडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून सुमारे ४५ हजार रुपयांंचा ऐवज जप्त करण्यात आला. रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास येथील पारीख पेट्रोल पंप परिसरात स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली.
सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव व त्यांचे सहकारी रविवारी पहाटे नवीन बसस्टँड भागात गस्त घालून वाहनांची तपासणी करीत होते. तपासणी करीत असताना दुचाकीवर असलेल्या दोन इसमांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी तेथून धूम ठोकली. संशय आल्याने पोलिसांनी चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला. परतवाडा रोडवरील पेट्रोल पंपासमोर त्यांना पकडण्यात आले.
संशयितांनी त्यांची ओळख संतोष रतन आठवले (३५) व सुनील कुंजीलाल आठवले (३०, दोन्ही रा. सोनापूर, ता. चिखलदरा) अशी सांगितली. पोलिसांना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची झडती घेतली असता, २० हजारांचा एलईडी टीव्ही, चार हजारांचा डीव्हीआर, सहा विदेशी मद्याच्या बॉटल व एम.एच. २७ ए.झेड. १४४८ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ४५ हजार ३४९ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
आरोपींनी अंजनगाव-दयार्पुर मार्गावरील भवानी बारमध्ये चोरी केल्याची कबुली पोलिसांनी दिली. आरोपींविरुद्ध कलम ४१ (१) (४) अन्वये फौजदारी कार्यवाही करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव, सुभाष राठोड, कॉन्स्टेबल रत्नदीप कडू, भुरेलाल जांभेकर, रूपाल, संदीप चौधरी, चेतन धाडे पुढील तपास करीत आहेत. सदर चोरीप्रकरण हे रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.