दोषी पोलिसांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:28 PM2017-10-26T23:28:21+5:302017-10-26T23:28:32+5:30
बर्थ-डे पार्टी उधळून महिला व पुरुषांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी दोन दिवसांत दोषी पोलिसांना निलंबित करा, अन्यथा धरणे आंदोलन करू, अशा इशारा भारतीय जनता पार्टी ....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बर्थ-डे पार्टी उधळून महिला व पुरुषांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी दोन दिवसांत दोषी पोलिसांना निलंबित करा, अन्यथा धरणे आंदोलन करू, अशा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिला. यासंदर्भात बुधवारी निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले.
एका प्रतिष्ठानात राहुल तिवारीच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सुरू असताना डिजे वाजविण्याच्या कारणावरून पोलीस व आयोजकांत वाद उफाळला. यावेळी पीएसआय चव्हाणसह पोलीस विजय आणि ईलियाज, संदीप व महिला पोलीस बिंंदू यांनी उपस्थित पुरुष व महिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप तिवारी कुटुंबीयांनी केला आहे. या मारहाणीत शिक्षक कोमल उके, राजू तिवारी, राहुल तिवारी, मनीष अहिरे यांच्यासह १० ते १५ विद्यार्थी जखमी झाले. पोलिसांनी महिलांना अपमानस्पद वागणूक दिल्याप्रकरणातील दोषी पोलिसांना निलंबीत करा, अशी मागणी प्रवीण देशमुख यांच्यासह शहराध्यक्ष योगेश वानखडे, ज्योती तिवारी, लिना अहिरे, कोमल उके, किरण राऊत, अर्चना अहिरे, लक्ष्मी अहिरे, मधु धांडेकर, सराफ, कैलास धांडेकर, जयराम पवार, मुंडाने, शांताराम शेळके, दत्ता चौघुले, रामराव श्रुंगारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन दिले असून दोन दिवसांच्या आत कारवाई करा, अन्यथा शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.