घरफोडी घडल्यास निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 10:43 PM2017-08-25T22:43:28+5:302017-08-25T22:43:51+5:30

भरदिवसा घरफोडी झाल्यास त्या परिसरात कर्तव्यावर असणाºया संबंधित पोलिसाला जबाबदार धरले जाईल.

Suspension if burglary happens | घरफोडी घडल्यास निलंबन

घरफोडी घडल्यास निलंबन

Next
ठळक मुद्देसीपींचा इशारा : 'प्लॅन आॅफ अ‍ॅक्शन' तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरदिवसा घरफोडी झाल्यास त्या परिसरात कर्तव्यावर असणाºया संबंधित पोलिसाला जबाबदार धरले जाईल. त्यांचे मॉनिटरिंग कमी असल्याचा निष्कर्ष काढून थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना दिला आहे.
मागील काही दिवसांपासून भरदिवसा सुरू असलेले घरफोडीचे सत्र पाहता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला असून त्याची अमंलबजावणी करण्याचे सक्त निर्देश पोलिसांना दिले आहेत. चोरांनी हायवेलगतचा परिसर टार्गेट केला असून दिवसाढवळ्या चोर घरफोडी करून पसार होत आहेत.
आरोपी तलवारसिंगचा शोध
अमरावती : मागील काही दिवसांत पंधरापेक्षा अधिक घरफोडीच्या घटना शहरात घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चोºया गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. चोरांनी नागरिकांसह पोलिसांची घरे सुद्धा सोडली नाहीत. घरफोडीच्या गुन्ह्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आता अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. चोरी व घरफोड्यांच्या घटनांबाबत सतर्क राहून कर्तव्य बजावण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या आहेत. तसेच पोलीस आयुक्त वायरलेसमार्फत पोलिसांना सुचना देत असून पोलीस यंत्रणा चोरांचा मागोवा घेण्याच्या कामी लागली आहे. प्रत्येक ठाण्यातील डीबी स्कॉडमध्ये पोलिसांना चोरीचा छडा लावण्यास सांगीतले आहे. कुख्यात आरोपी तलवारसिंगला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. आता तो कारागृहातून बाहेर आला आहे. त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु केले असावे, असा संशय पोलिसांना असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.
चार्लींची गस्त पुन्हा सुरु होणार
शहरात पूर्वी चार्ली कमांडो मोटरसायकलींवरून गस्त घालीत होते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चार्लींची नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा चार्ली कमांडोंना सक्रिय करण्यात आले असून गल्लीबोळातही गस्त सुरु राहणार आहे.
सीआरओ व्हॅनच्या पोलिसांची परेड
दिवसढवळ्या चोर घरफोड्या करून पसार होत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतरही ‘सीआरओ व्हॅन’चे पोलीस घटनास्थळी पोहोचत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. पोलीस वेळेवर पोहोचल्यास चोर हाती लागू शकतात. ही गंभीर बाब लक्षात आल्यामुळे पोलीस आयुक्तांनी सीआरओ व्हॅनमधील पोलिसांची कानउघाडणी केली. ‘सीआरओ व्हॅन’च्या पोलिसांची अकार्यक्षमता पाहता त्यांच्यात स्फूर्ती निर्माण व्हावी, यासाठी त्यांची परेड घेऊन धावण्याचा सराव घेण्याचे निर्देश सीपींनी दिले आहेत.
दिवसा नाकाबंदी, पेट्रोलिंग वाढविले
पोलिसांनी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत दिवसाच नाकाबंदी सुरु करून पेट्रोलिंग वाढविली आहे. नाकाबंदीदरम्यान महिलांना वगळून प्रत्येक संशयित व्यक्तीची तपासणी करण्याचे सक्त निर्देश सीपींनी दिले आहेत. चोरी करण्याचे साहित्य आढळल्यास त्याची सखोल चौकशी करण्याचे पोलिसांना बजावण्यात आले आहे.
काय आहे अ‍ॅक्शन प्लॅन
रेकार्डवरील व घरफोडीच्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
जिल्ह्याभरातील रेकार्डवरील गुन्हेगारांची यादी तयार
कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगारांवर लक्ष
बसस्थानक, रेल्वेस्थानकावर लक्ष
सराफा व्यापाºयांवर लक्ष ठेवणे
नागरिकांमध्ये जनजागृती करणे
नागरिकांच्या बैठकी घेणे
सीसीटीव्ही अनिवार्य करणे
सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन करणे
भंगार व्यावसायिकांची चौकशी करणे
विविध ठिकाणी नाकाबंदी, ांशयितांची चौकशी करणे

Web Title: Suspension if burglary happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.