चार कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

By admin | Published: February 26, 2016 12:25 AM2016-02-26T00:25:01+5:302016-02-26T00:25:01+5:30

कामात अनियमितता, हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेतील चार कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Suspension notice for four employees | चार कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

चार कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

Next

कारवाई : शिक्षण, बाजार परवाना विभागाचा समावेश
अमरावती : कामात अनियमितता, हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेतील चार कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
यात शिक्षण विभागातील तीन तर बाजार व परवाना विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाला भेट दिली असता सेवापुस्तिकेत बऱ्याच नोंदी नसल्याचे दिसून आले. शिक्षण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत नोंदी घेण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. त्यानुसार प्रभारी शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने यांनी शिक्षण विभागातील लिपीक विजय सुंदरानी, अरशी मिराज, राहुल वैद्य तर सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक शीतलकुमार चमनपुरे, बोरगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच बाजार, परवाना निरीक्षक राजेंद्र दिघडे यांना देखील नोटीस बजावण्यात आलली आहे. नोटीसचे उत्तर येताच पुढील कारवाई केली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: Suspension notice for four employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.