अमरावती तहसीलदारांच्या निलंबनाला अवघ्या २४ तासात 'स्टे'!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:36 PM2024-05-25T12:36:00+5:302024-05-25T12:36:47+5:30

Amravati : चांदूर बाजारच्या तहसीलदार अडकल्या एसीबीच्या जाळ्यात

Suspension of Amravati Tehsildars 'Stay' in just 24 hours! | अमरावती तहसीलदारांच्या निलंबनाला अवघ्या २४ तासात 'स्टे'!

Suspension of Amravati Tehsildars 'Stay' in just 24 hours!

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
मौजे नवसारी येथील भूखंडात हेराफेरी केल्याप्रकरणी अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना राज्याच्या वने व महसूल विभागाने २२ मे रोजी जारी केलेल्या निलंबन आदेशावर शुक्रवारी स्थगिती देण्यात आली. महसूल विभागाच्या कक्ष अधिकारी प्रगती विचारे यांच्या स्वाक्षरीने सुधारित आदेश जारी केले आहे. विशेष म्हणजे निलंबनाचे आदेशही प्रगती विचारे यांनीच जारी केले होते.


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीची खुली जागा खासगी व्यक्तीच्या नावे बेकायदेशीर हस्तांतरण करण्याचा प्रयत्न झाला. भूखंडाच्या हेराफेरी प्रकरणात तहसीलदार लोखंडे यांची ही कृती खासगी व्यक्तीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ देणारी ठरली तसेच यात लोखंडे हे सहभागी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे तहसीलदार लोखंडे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले होते. यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे कारवाई करण्याच्या अधिनतेने तहसीलदार लोखंडे यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेशात नमूद होते. मात्र, २४ मे रोजी महसूल विभागाने सुधारित आदेश जारी केल्याने तहसीलदार लोखंडे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

 

चांदूर बाजारच्या तहसीलदार अडकल्या एसीबीच्या जाळ्यात

चांदूर बाजार:शेतीचा फेरफार करून देण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या तहसीलदार गीतांजली नामदेवराव गरड-मुळीक (४८) व खासगी लिपिक किरण दामोदर बेलसरे (२९, रा. शिरजगाव बंड) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी चांदूर बाजार ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोघांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली. २८ मार्च ते २२ मे दरम्यान हा घटनाक्रम घडला. तक्रारदाराने २८ मार्चला तक्रार दिली होती.

एसीबीचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक मिलिंद बहाकर व मंगेश मोहोड, पोलिस निरीक्षक विजया पंधरे व चित्रा मेसरे, जमादार प्रमोद रायपुरे, नाईक युवराज राठोड, नीतेश राठोड, महेंद्र साखरे, कॉन्स्टेबल उमेश भोपते, वैभव जावले, चालक तथा सहायक उपनिरीक्षक बारबुद्धे, किटकुले यांनी ही कामगिरी पार पाडली.
 

Web Title: Suspension of Amravati Tehsildars 'Stay' in just 24 hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.