बेपत्ता व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:17 AM2018-09-13T01:17:14+5:302018-09-13T01:18:05+5:30
बेपत्ता मेडिकल स्टोअर संचालकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने बुधवारी खळबळ उडाली. प्रफुल्ल पुरुषोत्तम कांबळे (३०, रा. मिर्चापूर, ता.तिवसा) असे मृताचे नाव आहे. ही घटना फे्रजरपुरा हद्दीतील मार्डी रोडवरील अच्युत महाराज रुग्णालयापासून काही अंतरावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बेपत्ता मेडिकल स्टोअर संचालकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने बुधवारी खळबळ उडाली. प्रफुल्ल पुरुषोत्तम कांबळे (३०, रा. मिर्चापूर, ता.तिवसा) असे मृताचे नाव आहे. ही घटना फे्रजरपुरा हद्दीतील मार्डी रोडवरील अच्युत महाराज रुग्णालयापासून काही अंतरावर घडली. शवविच्छेदन अहवालात प्रफुल्लचा मृत्यू विषाने झाल्याचे स्पष्ट असले तरी त्याने विष घेतले की पाजण्यात आले, याबाबत संशय आहे. याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्रफुल्ल कांबळे याचे कुºहा येथे माउली मेडिकल प्रतिष्ठान असून, वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले. तो ९ सप्टेंबर रोजी आईसोबत एका एमआर मित्राच्या एमएच २७ एयू २०४४ या मोपेडने बहिणीची प्रकृती पाहण्यासाठी राजापेठ स्थित डॉ. बोंडे हॉस्पिटलला गेला. तेथून रात्री १० वाजता बाहेर पडला आणि मोपेडने गावाकडे निघाला होता. मात्र, त्यानंतर तो बेपत्ता झाला. नातेवाइकांना त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. बुधवारी प्रफुल्लचा मृतदेह मार्डी रोडलगत आढळून आला. या माहितीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यालगत प्रफुल्लचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला. घटनास्थळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. त्याची मोपेड झुडुपात आढळली. डिक्कीत सोन्याची चेन, काही पैसे व औषधी होत्या. यावरून त्याच्या हत्येचा कट आखल्याचा संशय व्यक्त होत आहे.
विष पाजून हत्या झाल्याचा अंदाज
इर्विन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कुंडे यांनी प्रफुल्ल कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवाल फे्रजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केला. शरीरावर जखमा किंवा गळा आवळल्याचे निशाण नाही. त्यामुळे हा वेगळा काही प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
...अन्यथा मृतदेह उचलणार नाही
प्रफुल्लची हत्याच झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. मारेकºयांचा शोध घेऊन त्यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. त्यामुळे घटनास्थळी नातेवाइकांचा रोष दिसून आला.
रस्त्यालगतच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. विष पाजून हत्या केली आणि मृतदेह फेकला असावा, अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक