‘हॉटस्पॉट’मध्येच स्वॅब सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:00 AM2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:01:08+5:30

मुंबईहून अमरावती जिल्ह्यात स्वगृही परतलेल्या पाच व्यक्ती आतापर्यंत संक्रमित झाल्याचा अहवाल आला आहे. यामध्ये २५ जूनमध्ये मुंबईहून चांदूर बाजार तालुक्यात आलेली २३ वर्षीय महिला व त्यांच्या तीन वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अचलपूर तालुक्यातील काकडा येथे १ जूनला मुंबईहून परतलेल्या ३० वर्षीय तरुणाचा व ६ जूनला २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Swab center in the hotspot itself | ‘हॉटस्पॉट’मध्येच स्वॅब सेंटर

‘हॉटस्पॉट’मध्येच स्वॅब सेंटर

Next
ठळक मुद्देएमएचओ । शनिवारी महानगरात चार, ग्रामीणमध्ये एक पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मसानगंज, रतनगंज भागात आठवडाभरात हायरिस्क नागरिकांच्या सुविधेसाठी थ्रोट स्वॅब सेंटर सुरू करण्यात येणार आहे. सेंटर असलेल्या नागपुरी गेट भागात संक्रमित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे हे केंद्र हॉटस्पॉटमध्ये सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांनी सांगितले. यादरम्यान शनिवारी महापालिका क्षेत्रात चार व ग्रामीण भागातून एका पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २७५ वर पोहोचली आहे
मसानगंज, रतनगंज आदी परिसरात अलीकडे कोरोनाचे संक्रमित अधिक प्रमाणात निष्पन्न झाले आहेत. यामध्ये संक्रमित रुग्णांसह हायरिस्कमधील नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी संबंधितांना केंद्रावर नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये अनेक भावनिक मुद्देदेखील नागरिक उपस्थित करीत असल्याचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे ज्या भागात रुग्णसंख्या अधिक, त्या ठिकाणी थ्रोट स्वॅब सेंटर सुरू करण्याची जिल्हा व आरोग्य प्रशासनाची भुमिका आहे. यापूर्वी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत महापालिका शाळेत हे केंद्र सुरू करण्यात आले होते. दुसरे केंद्र कोविड रुग्णालयात व तिसरे केंद्र हे तीन दिवसांपूर्वी पीडीएमसीमध्ये सुरू आहे
दरम्यान, शनिवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारा येथे भेट देऊन पालिकेच्या पथकांशी चर्चा केली. सर्दी, ताप, खोकला आदी कुठलेही लक्षण आढळणाऱ्या नागरिकांचा सतत पाठपुरावा व आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

आतापर्यंत पाच ‘मुंबई रिटर्न’ संक्रमित
मुंबईहून अमरावती जिल्ह्यात स्वगृही परतलेल्या पाच व्यक्ती आतापर्यंत संक्रमित झाल्याचा अहवाल आला आहे. यामध्ये २५ जूनमध्ये मुंबईहून चांदूर बाजार तालुक्यात आलेली २३ वर्षीय महिला व त्यांच्या तीन वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अचलपूर तालुक्यातील काकडा येथे १ जूनला मुंबईहून परतलेल्या ३० वर्षीय तरुणाचा व ६ जूनला २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ६ जूनला मुंबईहून अमरावती शहरातील समाधाननगरात परतलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

पुन्हा पाच पॉझिटिव्ह; एकूण २७५
महापालिका क्षेत्रात वडाळी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. हे वृद्ध एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक आहेत. या रुग्णालयातील सहा कर्मचारी आतापर्यंत संक्रमित झाले आहेत. समाधाननगरात चार दिवसांपूर्वी मुंबईहून परतलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या कुटुंबातील आठ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले, तर अचलपूर तालुक्यातील काकडा येथील २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या तरुणाला यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. बडनेरा येथील चावडी चौक परिसरातील ५० वर्षीय महिला तसेच फ्रेजरपुऱ्यांत १२ वर्षांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याव्यतिरिक्त अचलपुरातील ६० वर्षीय महिला उपचारार्थ नागपूरला दाखल आहे. त्यांची नमुने तपासणी तेथीलच एका खासगी लॅबमध्ये करण्यात आली असता, अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

Web Title: Swab center in the hotspot itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.