स्वाभिमानी विद्यार्थी संघटना रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:55 AM2018-02-23T00:55:05+5:302018-02-23T00:55:16+5:30
येथून वर्धा, आष्टी, आर्वीकरिता दिवसभरात २३ फेºया जातात. परंतु, एकाही फेरीचा गाडेगावला थांबा नाही. त्यामुळे दहावी, बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत.
ऑनलाईन लोकमत
वरूड : येथून वर्धा, आष्टी, आर्वीकरिता दिवसभरात २३ फेºया जातात. परंतु, एकाही फेरीचा गाडेगावला थांबा नाही. त्यामुळे दहावी, बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत. या मुद्द्यावर स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने परिसरातील विद्यार्थ्यांसमवेत चक्काजाम आंदोलन केले. तेथे दाखल झालेल्या आगार व्यवस्थापकांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
ऐन दहावी, बारावी परीक्षेच्या तोंडावर गाडेगाव, वाडेगाव, काटी, वडाळा, वंडली, वघड येथील विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी केंद्र गाठावे लागत आहे. त्याची दखल घेऊन स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने ऋषीकेश राऊत यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. मार्गातील वाहतूक ठप्प झाल्यामुळे घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणला. मात्र, ते जुमानले नाहीत. अखेरीस आगार व्यवस्थापक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ऋषीकेश राऊत यांच्यासह सागर धोटे, अभिजित भुयार, प्रेम अधव, गौरव पचपोहर, मीनल चारपे, माधुरी बारांगे, तुषार बारांगे, सुयोग बहुरूपी, आदित्य भोंडे, गुडू बहुरूपी, मंगेश ठाकरे, पवन ठाकरे, वैष्णवी शेवतकर, प्रिया शेळके, प्रणाली शेळके, प्रणाली साबळे, अनिकेत जांभूलकर, अंकुश भड, निकिता होले, साक्षी जाधव, आदित्य गाढवकर, प्रणय गायकवाड, फरीन खान, धनश्री दापूरकर आदी उपस्थित होते.