‘स्वच्छ भारत पंधरवडा’राबवा, शिक्षण विभागाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:10 PM2017-08-23T23:10:21+5:302017-08-23T23:10:54+5:30
पंतप्रधानांच्या आदेशानुसार २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने येत्या १ ते १५ सप्टेंबर याकालावधीत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा केला जाईल.
अमरावती : पंतप्रधानांच्या आदेशानुसार २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने येत्या १ ते १५ सप्टेंबर याकालावधीत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा केला जाईल.
याबाबत केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनामार्फत राज्यभर हा पंधरवडा साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना ४ आॅगस्ट रोजी जारी केल्या आहेत. यानुसार १ सप्टेंबर रोजी सर्व शाळा व शिक्षण संस्थांनी ‘स्वच्छता शपथ’ कार्यक्रमाचे आयोजन करावे, यात विद्यार्थी, शिक्षक,कर्मचाºयांनी सहभागी व्हावे, सोबतच पंधरवडयातील पहिल्या आठवड्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षकसंघ किंवा पालक आणि शिक्षकांच्या बैठकी बोलावून मुलांना तसेच शिक्षकांना स्वच्छता व स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धतीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे, शिक्षकांनी शाळेतील स्वच्छता विषयक सुविधांची तपासणी करावी, आवश्यकता भासल्यास स्वच्छतेसाठी उपलब्ध सुविधांच्या देखभाल दुरूस्तीसाठी प्रस्ताव, योजना तयार करावी, जिल्हा, तालुका, पंचायतस्तरावर स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर व शौचालयांसाठी स्पर्धा घेण्यात याव्यात, विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला, स्वच्छता विषयावर वादविवाद स्पर्धांचे आयोजन करावे, अशा विविध प्रकारच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने याआदेशातून जारी केल्या आहेत.