शपथविधीचा डामडौल

By admin | Published: October 29, 2014 01:44 AM2014-10-29T01:44:45+5:302014-10-29T01:44:45+5:30

राज्यातील पहिल्यावहिल्या भाजपाप्रणीत सरकारच्या शपथविधी सोहळ्य़ाकरिता सुप्रसिद्ध नेपथ्य रचनाकार नितीन चंद्रकांत देसाई हे भव्यदिव्य सेट उभारत आहेत

Swearing-in ceremony | शपथविधीचा डामडौल

शपथविधीचा डामडौल

Next
मुंबई : राज्यातील पहिल्यावहिल्या भाजपाप्रणीत सरकारच्या शपथविधी सोहळ्य़ाकरिता सुप्रसिद्ध नेपथ्य रचनाकार नितीन चंद्रकांत देसाई हे भव्यदिव्य सेट उभारत असून उद्योजक, बॉलीवूडचे तारे-तारका यांच्यासह तब्बल पाच हजार निमंत्रितांना निमंत्रणो धाडण्यात आली आहेत. व्यासपीठावर 2क्क् मान्यवरांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र या सोहळ्य़ात फारच थोडे मंत्री शपथ घेणार असल्याने जेमतेम अध्र्या तासाच्या या कार्यक्रमाकरिता एवढा डामडौल कशाला, असा सवाल भाजपातील काही मंडळी करीत आहेत.
राज्य शासनाचा राजशिष्टाचार विभाग वानखेडे स्टेडियमवरील या शपथविधी सोहळ्य़ाकरिता तयारी करीत आहे. मात्र सरकारी छापाच्या या कार्यक्रमावर भाजपाचे नेते समाधानी नसल्याने नेपथ्य रचनाकार नितीन  देसाई यांना शपथविधी सोहळ्य़ाची तयारी सोपवण्याचे मंगळवारी ठरले. वानखेडे स्टेडियम शपथविधीकरिता विनामूल्य दिले असले तरी देसाई हे मोफत काम करणार किंवा कसे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या सोहळ्य़ाचे भल्यामोठय़ा रकमेचे बिल कालांतराने राजशिष्टाचार विभागाला धाडले जाण्याची शक्यता आहे. 
या सोहळ्य़ाकरिता उद्योजकांना निमंत्रित करण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर तर बॉलीवुड तारे-तारकांना आणण्याची जबाबदारी पक्षाच्या खजिनदार शायना एन. सी. यांच्यावर सोडलेली आहे. महाराष्ट्रातील पद्मश्री, पद्मविभूषण प्राप्त मान्यवरांना आणण्याची जबाबदारी मधू चव्हाण यांच्यावर तर साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रतील मान्यवरांना निमंत्रित करण्याची जबाबदारी केशव उपाध्ये यांच्या शिरावर टाकलेली आहे. भाजपा व संघाच्या कार्यकत्र्याना आमंत्रित करण्याची जबाबदारी मुकुंदराव कुलकर्णी यांच्यावर सोडलेली आहे. एकूण पाच हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली जाणार असून, व्यासपीठावर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल अशा 2क्क् मान्यवरांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Swearing-in ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.